भाजपा चामोर्शी तालुक्याची मासिक बैठक उत्साहात संपन्न


- सेवा संकल्प अभियानाच्या यशस्वी नियोजनावर सविस्तर चर्चा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. रवींद्रजी चव्हाण यांच्या सूचनेनुसार भाजपा चामोर्शी तालुक्याची मासिक बैठक चामोर्शी येथील आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे यांच्या कर्तव्य कक्ष क्र. २ जनसंपर्क कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा. रमेशजी बारसागडे होते, तर चामोर्शी तालुका प्रभारी तथा महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्या पुणेचे संचालक इंजि. प्रमोदजी पिपरे यांची प्रमुख उपस्थिती होती. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते १८ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या सेवा संकल्प अभियानच्या विविध उपक्रमांच्या नियोजनावर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी चामोर्शी तालुका प्रभारी तथा संचालक महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्या पुणे चे इंजि. प्रमोदजी पिपरे यांनी मार्गदर्शन करताना सेवा संकल्प अभियान हे केवळ कार्यक्रमांपुरते मर्यादित न ठेवता प्रत्येक कार्यकर्त्याने समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचून सेवा, जनसंपर्क आणि संघटनवाढीचे प्रभावी माध्यम म्हणून राबवावे, असे आवाहन केले.S I R नुसार १ सप्टेंबर रोजी बूथा ची यादी प्रत्येक बुथावर प्रकाशित झालेली आहे. या यादीमध्ये आपल्या पक्षातील नागरिकांचे नावे आहेत काय हे पाहणे.नाव सुटले असतील ते नाव समाविष्ट करण्यासाठी १ सप्टेंबर ते ३१ सप्टेंबर ही तारीख निश्चित केली आहे.शासकीय बी.एल.ओ.यांच्या कडे १६ नंबरचा फॉर्म भरून देण्यात यावे तसेच बूथस्तरावर संघटना अधिक सक्षम करण्यासोबतच नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी कार्यकर्त्यांनी सातत्याने पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.
भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा. रमेशजी बारसागडे यांनी आपल्या मार्गदर्शनात सेवा संकल्प अभियानातील प्रत्येक उपक्रमाचे प्रभावी नियोजन करून त्यामध्ये बूथप्रमुख, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्याचे आवाहन केले. पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी बूथस्तरावरील संपर्क अधिक व्यापक करण्यावर त्यांनी विशेष भर दिला. जनसेवा आणि संघटनबळ या दोन्ही बाबींच्या माध्यमातून भाजपा अधिक मजबूत करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
अभियानांतर्गत आशीर्वादाचा दिवा, स्वप्नांचा भारत, चित्रकला व भाषण स्पर्धा, नमो सेवा गाथा सादरीकरण, अंगणवाडी सेविका सन्मान, विकासकामांची रील स्पर्धा, सेवा दीप यात्रा, सेवा सेतू अभियान, सेवा व आपले योगदान, रांगोळी स्पर्धा, विकसित भारत संकल्प यात्रा, इनोव्हेशन चॅलेंज, जनसेवेचा महाकुंभ पवित्र जल संकलन तसेच वडनगर ते वाराणसी यात्रा आदी विविध उपक्रम यशस्वीपणे राबविण्याचा संकल्प करण्यात आला. बैठकीला तालुका अध्यक्षा रोशनीताई वरघंटे, जिल्हा सचिव दिलीपजी चलाख, तालुका महामंत्री शेषरावजी कोहळे, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष भुवनेश्वर चुधरी, महिला मोर्चा तालुका अध्यक्षा कविताताई किरमे, किसान मोर्चा जिल्हा महामंत्री साईनाथ बुरांडे, माधवी पेशेट्टीवार यांच्यासह भाजपा पदाधिकारी, बूथ प्रमुख आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीदरम्यान आगामी सेवा संकल्प अभियान प्रभावीपणे व व्यापक स्वरूपात राबवून चामोर्शी तालुक्यात संघटन बळकटीकरणासोबत जनसंपर्क वाढविण्याचा निर्धार करण्यात आला.




Petrol Price




