विरव्हा येथील उमा नदी पात्रातून अवैधरीत्या रेती उत्खनन वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले
- सिंदेवाही तहसिल कार्यालयात वाहन जप्त -१ लाख १८ हजार रुपये दंड
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / सिंदेवाही : तालुक्यातील विरव्हा येथील उमा नदीच्या पात्रातून अवैध प्रकारे रेती उत्खनन करून रात्रौ रेतीचे वाहतूक करणारे ट्रॅक्टर सिंदेवाही कार्यालय येथे जप्त करण्यात आले आहे. प्राप्त महिती नुसार विरव्हा उमा नदी पात्रातून रेती भरून ट्रॅक्टर वाहन क्रमांक एम एच ३४ बी आर ६८२८ , असा असून हा ट्रॅक्टर सिंदेवाही महसूल विभागाचे तलाठी मुरकुटे व अहीरकर यांना रात्रौ बारा वाजताच्या दरम्यान अवैध प्रकारे रेती वाहतूक करत आहे अशा गोपनीय माहिती मिळाली त्या माहिती आधारे विरव्हा येथे गेले. त्यांना सदर वाहन दिसून आले त्यांनी ते ट्रॅक्टर वाहन थांबविले असता ट्रॅक्टर ट्रॉली मध्ये एक ब्रास रेती भरलेले दिसले लगेचच त्यांनी ते सदर वाहन ट्रॅक्टर ट्रॉली आपल्या ताब्यात घेऊन सिंदेवाही तहसील कार्यालयात सदर वाहन जप्त केले व तहसीलदार यांना सांगितले. १० नोव्हेंबर २०२२ ला सदर ट्रॅक्टर मालकावर अवैध प्रकारे गौण खनिज उत्खनन केल्यामुळे १ लाख १८ हजार रुपयांच्या दंड आकारण्यात आला असून असा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी चिमूर यांना पाठवण्यात आला आहे.
News - Chandrapur