भामरागड़ केंद्रांतर्गत चौथे शिक्षण परिषद संपन्न
विदर्भ न्युज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड़ : केंद्रांतर्गत १२ ऑगस्ट २०२२ ला चौथे शिक्षण परिषद राजे धर्मराव हायस्कूल भामरागड़ येथे घेण्यात आले. शिक्षण परिषदेला अध्यक्ष म्हणून विनोद पुसलवार केंद्र प्रमुख भामरागड़, उद्घाटक म्हणून हकीम प्राचार्य राजे धर्मराव हायस्कूल भामरागड़ केंद्रातील सर्व शिक्षक, शिक्षिका यांच्या प्रमुख उपस्थितीत चौथे शिक्षण परिषद राजे धर्मराव हाय. स्कूल भामरागड येथे यशस्वीपणे पार पडले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनोद पूसलवार केंद्र प्रमुख भामरागड़, शिक्षण पर्वावर आधारित डेमो लेसन विनित पद्मावार, घाटबांधे, मोद, खंडाडकर मुलीचे शिक्षण सातपुते साधन व्यक्ती, दिव्यांग शिबीर भांडेकर, फुलोरा आधारित तासिका खोब्रागडे, फुलोरा आढावा सामलवार सुलभक यांनी विविध उदाहरणांसह मनोरंजन पद्धतीने विद्यार्थ्यांचा गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षक म्हणून काय करता येईल. याविषयीची मोलाचे मार्गदर्शनात्मक तासीका घेतले शिक्षण परिषद यशस्वीतेसाठी केद्रातील शिक्षकांनी सहकार्य केले.
News - Gadchiroli