महत्वाच्या बातम्या

  कूलरमध्ये पाणी टाकताना विजेचा शॉक : ७२ वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : कूलरमध्ये पाणी टाकताना वीजेचा शॉक लागून एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला.

माहितीनुसार हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सदर घटना घडली असून कुसूम महादेव चावलकर (७२) रा. सच्चिदानंद नगर असे मृतक महिलेचे नाव आहे.

१८ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास त्या घरच्या कूलरमध्ये पाणी टाकत होत्या. कूलरची वायर प्लगला लागली असल्याने त्यांना वीजेचा जोरदार शॉक बसला. त्या बेशुद्ध झाल्या. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना उपचारासाठी मेडिकल इस्पितळात नेले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. हुडकेश्वर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos