महत्वाच्या बातम्या

 पोलीस स्टेशन राजुराचे गुन्हे अन्वेषन विभागाकडुन १० घरफोडी गुन्हे उघडीकस : २ आरोपींना अटक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / बल्लारपूर : पोलीस स्टेशन राजुरा चे गुन्हे अन्वेषन विभागाकडुन एकुण १० घरफोडी गुन्हे उघडीकस आणून २ आरोपींना अटक करून अंदाजे सहा लाख चे मुद्देमाल हस्तगत केले.

पोलीस स्टेशन राजुरा येथे साखरवाही येथील रमेश बापुराव बरडे यांचा घरी १३ फेब्रुवारी रोजी चोरी झाली होती. फिर्यादी व त्याची पत्नी घराला कुलुप लावुन शेतामध्ये गेले व शेतामध्ये दिवसभर काम करून सायंकाळी परत आले असता कोणीतरी अज्ञात व्यक्तीने दरवाज्याचा ताला तोडुन आत प्रवेश करून सामान अस्ताव्यस्त करून आलमारीचे लॉकरमध्ये ठेवुन असलेले ०६ नग सोन्याचे जिवत्या प्रत्येकी अर्धा ग्रॉम वजनाचे कि. अं ६ हजार रू. नगदी ५ हजार रू. असा एकुण ११ हजार रू. चा मुद्देमाल चोरून नेली अशा फिर्यादीचे तक्रारीवरून पो. स्टेला अप. क १२५/२०२४ कलम ४५४, ३८० भादवी अन्वये गुन्हा नोद करून तपासात होते.

पोलीस अधिक्षक मुमक्का सुदर्शन चंद्रपुर, अप्पर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु चंद्रपुर, उपविभागिय पोलीस अधिकारी दिपक साखरे राजुरा यांचे मार्गदर्शनात  पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांनी गुन्हे अन्वेषन विभाग राजुरा यांना पो. स्टेला घरफोडीचे गुन्हाची दाखल बाबत गांभीर्य लक्षात घेता अज्ञात आरोपीचा तात्काळ शोध घेण्याबाबत आदेश दिल्यावरून डि.बी. इंचार्ज पोउपनि पांडुरंग हाके सोबत पोहवा सुनील गौरकार, पोहवा किशोर तुमराम, पोशि तिरूपती जाधव, पोशि महेश बोलगोडवार पोशि रामराव विंगेवाड, पोशि योगेश पिदुरकर यांनी गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन घटनास्थळी भेट देवून गुन्हयाचे अज्ञात आरोपीचा शोध करीत असतांना १५ फेब्रुवारी २०२४ रोजी मिळालेल्या मुखबिरच्या खबरेवरून रामपुर येथे राहणारा समास देवारसिंग निषाद (४०), जात- केवट, धंदा- मजुरी, मुळ पत्ता- बिहरी खुर्द, ता. अंबागड चौकी, जि. राजनांदगाव, पोलीस ठाणे- अंबागड चौकी, राज्य छत्तीसगड ह.मु. कामगार नगर रामपुर, ता. राजुरा, जि. चंद्रपुर व बलराम दुर्जन निषाद (२७), धंदा- मिस्त्री काम, मुळ पत्ता-बिहरी खुर्द, ता. अंबागढ चौकी, जिल्हा-राजनांदगाव, राज्य-छत्तीसगढ, ह. मु महेश नगर, तुकुम ख्रिश्चन दवाखान्याचे मागे रेल्वे पटरीजवळ चंद्रपुर, ता.जि. चंद्रपुर यांना रामपुर हददीतील शिवमंदीर च्या मागे संशयास्पद दिसुन आल्याने पंचासमक्ष ताब्यात घेवुन त्यांना विचारपुस केली असता त्यांनी प्रथमता उडवाउडवीचे उत्तरे दिली त्यांना बारकाईने विचारपुस केली असता गुन्हा केल्याचे कबुली दिल्याने त्यांना पोरटे राजुरा अप क्रमांक १२५ / २४ कलम ४५४,३८० भादवी या गुन्हयात अटक करून पोलीस कस्टडी रिमांड घेवुन त्यांचेकडे पोस्टे राजुरा येथील अभिलेखावर नोंद असलेले घरफोडीच्या गुन्हयाबाबत विश्वसात घेवुन विचारपुस केली असता आरोपीने या अगोदर रामपुर, खामोना येथील दोन, माथरा, पांढरपौनी, पवनी, चनाखा, टेंबुरवाही, सोंडा येथील प्रत्येकी एक याप्रमाणे एकुण १० ठिकाणी घरफोडी केल्याचे सांगतिलेवरून सदर घटने ठिकाणाबाबत पो.स्टे राजुराचे अभिलेखानुसार पो.स्टे राजुरा अप क्र.१२५/२४ कलम ४५४, ३८० भादवी, अप.क्र ५३२/२०२३ कलम ४५४, ३८० भादवी,अप.क्र ५८८/२०२३ कलम ४५४, ३८० भादवी, अप.क्र. ६२०/२०२३ कलम ४५४,३८० भादवी,अप. क्र ०७/२०२४ कलम ४५४, ३८० भादवी, अप.क्र. ८०/२०२४ कलम ४५४, ३८० भादवी,  ४७४/२०२३ कलम ४५४, ४५७, ३८० भादवी तसेच पो.स्टे विरूर येथे अप.क्र. ३५७/२३ कलम ४५४, ३८० भादवी, अप. क्र. ३१०/२०२४ कलम ४५४, ३८० भादवी, अप क्र. ५३/२०२४ कलम ४५४,३८० भादवी अन्वये गुन्हे दाखल असुन असे वरील नोंद असलेल्या एकुण १० घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणुन सदर गुन्हयातील चोरीस गेलेल्या मालापैकी सोन्याचे दागिने अंदाजे वजन १४० ग्रॅम कि.अं. ५ कोटी ८ लाख ५ हजार, चांदीचे दागिने अंदाजे वजन १७० ग्रॅम वजन कि.अं. ८ हजार ३०० रू., नगदी ७हजार रू., घरफोडी करणे करीता वापरलेले हत्यार कि.अं. १०० रू., गुन्हा करतेवेळेस वापरलेली निळया रंगाची होन्डा साईन मोटार सायकल कि.अं. ८० हजार असा एकुण ६ लाख ३ हजार ९०० रू. चा माल आरोपी कडुन हस्तगत करण्यात आला.

सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक मुमक्का सुदर्शन चंद्रपुर, अप्पर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु चंद्रपुर, उप विभागिय पोलीस अधिकारी दिपक साखरे राजुरा यांचे मार्गदर्शनात व पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांचे नेतृत्वात गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रभारी इंचार्ज पोउपनी पांडुरंग हाके, पोहवा सुनिल गौरकार, पोहवा किशोर तुमराम, पोशी महेश बोलगोडवार, पोशी तिरूपती जाधव, पोशी रामराव विंगेवाड, पोशी योगेश पिदुरकर, सफौ. खुशाल टेकाम यांनी पार पाडली.





  Print






News - Chandrapur




Related Photos