वैरागड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन : माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांची सदिच्छा भेट

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालूका प्रतिनिधी / आरमोरी : आरमोरी तालुक्यातील ऐतिहासिक वैरागड येथे नुकताच छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्यास माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांना निमंत्रित करण्यात आले होते. मात्र काही महत्त्वाच्या कामानिमित्त त्यांना त्या कार्यक्रमास उपस्थित राहता आले नव्हते.
आज २९ मे २०२६ रोजी वैरागड येथे भेट दिल्यानंतर खा. डॉ. अशोकजी नेते यांनी छत्रपती शिवाजी मंडळाच्या सदस्यांची सदिच्छा भेट घेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, पराक्रम आणि राष्ट्रनिष्ठेच्या विचारांना अभिवादन केले.
विशेष म्हणजे, ज्या चौकात हा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे तो चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक या नावाने संपूर्ण वैरागड परिसरात ओळखला जातो. त्यामुळे या ठिकाणाला ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
यावेळी संग्राम ग्रुपचे अध्यक्ष वैभव सपाटे, अवि राऊत, संतोष बावणकर,पुनित बावणार,रुचित बोधणार तसेच श्री. छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव मित्र मंडळाचे सदस्य उपस्थित होते. स्थानिक नागरिकांनी देखील डॉ. अशोकजी नेते यांचे स्वागत करत आनंद व्यक्त केला.
News - Gadchiroli




Petrol Price




