महत्वाच्या बातम्या

 विश्वकर्मा योजनेसाठी तालुकानिहाय विशेष मेळावे : नामंजूर अर्जांचे पुन:स्वीकृतीकरण होणार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत नामंजूर झालेल्या अर्जांचे पुन:स्वीकृतीकरण करण्यासाठी जिल्ह्यात १ ते २४ जुलै २०२६ या कालावधीत विविध तालुक्यांमध्ये बँकांच्या माध्यमातून विशेष मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यांमध्ये लाभार्थ्यांना अर्जातील त्रुटी दूर करून पुन:स्वीकृतीची प्रक्रिया पूर्ण करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

यानुसार ७ जुलै रोजी ग्रामपंचायत शाहपूर येथे, १० जुलै रोजी आरएसईटीआय (RSETI) भंडारा येथे, १४ जुलै रोजी पंचायत समिती तुमसर, १५ जुलै रोजी पंचायत समिती साकोली, १७ जुलै रोजी पंचायत समिती मोहाडी, २० जुलै रोजी पवनी, २३ जुलै रोजी लाखनी आणि २४ जुलै रोजी पंचायत समिती लाखांदूर येथे विशेष मेळावे आयोजित करण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेशी संबंधित सर्व लाभार्थ्यांनी आपल्या तालुक्यात आयोजित विशेष मेळाव्यास उपस्थित राहून अर्जाच्या पुन:स्वीकृतीची प्रक्रिया पूर्ण करावी. तसेच या योजनेचा जास्तीत जास्त पात्र नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अग्रणी जिल्हा व्यवस्थापक, भंडारा यांनी केले आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos