नाशिक : रॅगिंगच्या त्रासाला कंटाळून वैद्यकीय विद्यार्थ्यांची आत्महत्या


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नाशिक​ :
नाशिकच्या वसंत पवार मेडिकल कॉलेज मध्ये पहिल्या वर्षात शिकत असलेल्या स्वप्नील शिंदे या विद्यार्थ्यांने आत्महत्या केली आहे. मुलाच्या नातेवाईकांनी मात्र ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप करण्यात आला आहे. कॉलेजमधील मुली त्याची नेहमी  रॅगिंग करत असत या त्रासाला कंटाळून स्वप्नील ने याअगोदरही आत्महत्या करण्याचा प्रयन्त केला होता. कॉलेजमधील त्रास थांबत नसल्याने स्वप्नीलने आत्महत्या केली.
मात्र कॉलेज प्रशासनने आत्महत्या नसून तो चक्कर येऊन पडला असल्याचे म्हटले.  दरम्यान त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात आणला आहे. गुन्हा दाखल होत नाही तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
नाशिकच्या वसंतराव पवार मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये एका शिकाऊ डॉक्टरचा संशयास्पद मृत्यु झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. डॉक्टर स्वप्नील शिंदे असे या डॉक्टरचे नाव असून तो गायनॅकॉलॉजीच्या दुसर्यात वर्षात शिक्षण घेत होता. स्वप्नीलकडे आढळून आलेल्या सुसाइड नोटमध्ये त्याने रॅगिंग करणार्यांघची नावेही दिली असल्याचा दावा त्याच्या कुटुंबियांनी केला आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार कॉलेजमधील काही मुली त्याला मुद्दाम त्रास देत होत्या. त्याचा वारंवार मानसिक छळ केला जात असल्याचा आरोप स्वप्नीलच्या कुटुंबियांनी केला आहे. स्वप्नीलकडे आढळून आलेल्या सुसाइड नोटमध्ये त्याने रॅगिंग करणाऱ्यांची नावेही दिली असल्याचा दावा त्याच्या कुटुंबियांनी केला आहे. पोलीसांकडून याबाबत तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोपही करण्यात येत आहे.
रॅगिंग प्रकरणातून स्वप्नीलचा घातपात झाल्याचा कुटुंबियांकडून आरोप करण्यात केला आहे. याप्रकरणी दोन मुलींसह कॉलेज प्रशासनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी कुटुंबियांनी केली आहे. कुटुंबियांकडून करण्यात आलेल्या आरोपांचे कॉलेज प्रशासनाकडून खंडन करण्यात आले आहे.   Print


News - Rajy | Posted : 2021-08-18
Related Photos