महत्वाच्या बातम्या

 गुढीपाडव्याला मराठमोळ्या वेशभूषेत निघणार महिलांची स्कुटी रॅली


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : मंगलमय  सण गुडीपाडव्याच्या पूर्व संध्येला मराठी नवीन वर्षाच्या स्वागताकरिता नऊवारीसह मराठमोळ्या पारंपरिक वेशभूषेत ८ एप्रिल रोजी महिलांच्या भव्य स्कूटी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा सोमवार ८ एप्रिल रोजी संध्याकाळी ५ वाजता गुढीपाडव्याच्या पूर्व संध्येला मराठी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आयोजित या भव्य स्कूटी रॅलीत शहरातील सर्व महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आधारविश्व फाउंडेशनच्या अध्यक्ष गीता हिंगे आणि माणिक ढोले यांनी केले आहे. या रॅलीचा प्रारंभ स्थानिक साई मंदिर येथून होईल आणि समारोप राधे बिल्डिंग समोर होणार आहे. या रॅलीत महिलांनी  नऊवारी, नथ व फेटा अशा पारंपरिक मराठमोळ्या वेशभूषेत सहभागी व्हायचे आहे. फेटे बांधण्यासाठी सर्वांनी साई मंदिर येथे दुपारी ३ वाजता उपस्थित राहायचे आहे. या उपक्रमाच्या अतिरिक्त माहितीसाठी अध्यक्ष गीता हिंगे ९१६८१६४४४१, माणिक ढोले ८४८४८२६३०८, सुनीता साळवे ९४२३१२२९३४, विजया मने ९४२१७३४४३४, उज्ज्वला वालोदे ९३७३७८२३१३ यांच्याशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos