सावली पोलिसांची कारवाई : अवैध गोवंश वाहतूक पकडली
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / बल्लारपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील सावली पोलिसांनी अवैध गोवंश जनावरांची वाहतुक होत असताना पकडली.
सावली पोलिसांना अवैध गोवंश जनावरांची वाहतुक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली असता. त्यानुसार ८ एप्रिलला रात्री ०१:०० वाजताच्या सुमारास मुल दिशेकडून गोंडपिंपरी जाणाऱ्या मार्गावर खेडी फाटा येथे नाकाबंदी करून मुल कडून येणाऱ्या कंटेनर आयशर ट्रक क्रं TS 12 UD 2780 थांबवले असता चालक पोलिसांना पाहून वाहन सोडून पळून गेला.
सदर ट्रक कंटेनर पाहणी केली असता कंटेनरमध्ये एकूण ३६ गोवंश जातीचे जनावरे अत्यंत निर्दयतेने बांधलेल्या अवस्थेत दिसून आले. मिळून आलेले एकूण ३६ गोवंश जनावरे किंमत ०३ लाख ६० हजार रुपये व नमूद क्रमांकाचा आयशर ट्रक किंमत अंदाजे १० लाख रुपये असा एकूण किंमत १३ लाख ६० हजार रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त गोवंश जनावरे ही गोशाळेत दाखल करण्यात आले असून आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक रवींद्र सिंग परदेशी, अप्पर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार आशिष बोरकर यांच्या नेतृत्वात हवालदार दर्शन लाटकर, विशाल दुर्योधन, मोहन दासरवर यांनी केली.
News - Chandrapur