जेईई मेन्स परीक्षेचा पहिला टप्पा २७ पासून : बी.आर्किटेक्टची परीक्षा २४ जानेवारीला
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी नॅशनल टेस्टींग एजेन्सीद्वारे घेण्यात येणारी जेईई परीक्षेचा पहिला टप्पा २७ जानेवारीपासून सुरू हाेत आहे. बारावीत असलेले व उत्तीर्ण झालेले विद्यार्थी २७ जानेवारी ते १ फेब्रुवारीदरम्यान ही परीक्षा देतील.
त्यासाठी तयारीला लागलेल्या विद्यार्थ्यांना आता प्रवेशपत्रांची प्रतीक्षा लागली आहे.
दाेन टप्प्यात हाेणारी जेईई मेन्स परीक्षा एनटीएद्वारे आयाेजित केली जाते. बीई व बी.टेक. अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी ३० नाेव्हेंबर ते ४ डिसेंबर या काळात ऑनलाईन नाेंदणी केली. छायाचित्र अपलाेड करण्यास अडचणी लक्षात घेता ६ जानेवारीपर्यंत अतिरिक्त वेळ देण्यात आला हाेता. दरम्यान एनटीएद्वारे जेईईची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. २७, २९, ३०, ३१ जानेवारी व १ फेब्रुवारीला ही परीक्षा घेतली जाणार आहे. लवकरच विद्यार्थ्यांनी निवडलेली परीक्षा केंद्र व शहरांची माहिती एनटीएच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात येणार आहेत. परीक्षेच्या दाेन ते तीन दिवसांअगाेदर विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र देण्यात येतील, अशी माहिती आहे. विद्यार्थ्यांनी वेळाेवेळी वेबसाईटवर भेट द्यावे, असे आवाहन एनटीएने केले आहे.
दरम्यान बी. आर्किटेक्ट व बी. प्लॅनिंग या अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा येत्या २४ जानेवारीला हाेणार असून २ ए व २ बी पेपर दाेन सत्रांमध्ये हाेतील. या परीक्षांच्या विद्यार्थ्यांनी निवडलेले केंद्र व शहराची माहिती एनटीएच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आली आहे.
News - Nagpur