हनपायली येथे माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते विकास कामांचे भूमिपूजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / एटापल्ली : तालुक्यातील सरखेडा ग्रामपंचायत अंतर्गत समाविष्ट हनपायली येथे माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
एटापल्ली तालुक्यातील सरखेडा ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेला हनपायली हा गाव अतिदुर्गम व आदिवासीबहुल म्हणून ओळखला जातो. यासह तालुक्यातील अशा अनेक गावांचा कायापालट करण्याचा निर्धार मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी घेतला असून विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात येत आहे. सरखेडा ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या विविध गावांत विकासात्मक कामे मंजूर केली असून नुकतेच माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्याहस्ते येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी सरखेडाचे सरपंच वर्षा उसेंडी, उपसरपंच रमेश दुग्गा, विजू मडावी, सैनु उसेंडी, भूमिया अशोक उसेंडी, मणिराम उसेंडी, संगीता येरणे, रुक्मा उसेंडी, गुरुदास टिंगूसले, संपत येरणे, महादू उसेंडी, सोमाजी गणुजी उसेंडी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष श्रीकांत कोकुलवार, माजी जि.प. सदस्य ज्ञानकुमारी कौशी, येमलीचे सरपंच ललिता मडावी, जारावंडीचे सरपंच सपना कोडापे, नगरसेवक जितेंद्र टिकले, विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येरावार, नगरसेविका निर्मला हिचामी, सरिता हिचामी, माजी नगरसेविका सगुणा हिचामी आदी परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
News - Gadchiroli