विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते ब्रम्हपूरी शहरातील विविध विकासकामांचे लोकार्पण व भुमीपुजन
- स्व. इंदीरा गांधी चौक, बॅ. खोब्रागडे चौकाचे सौंदर्यीकरण व जलतरण तलाव या विकासकामांचा समावेश
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या विशेष प्रयत्नांतुन ब्रम्हपूरी शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामे पुर्णत्वास आली आहेत. तर काही विकासकामे नव्याने मंजूर झाले असुन या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते करण्यात आले.
ब्रम्हपूरी शहरातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पटांगणाच्या बाजूला बांधण्यात आलेल्या जलतरण तलावाचा लोकार्पण सोहळा (४ कोटी रू.), स्व. इंदीरा गांधी चौकाचे सौंदर्यीकरण करणे (३६ लाख रू.), बॅरिस्टर राजा खोब्रागडे चौकाचे सौंदर्यीकरण करणे (३७ लाख रू.) या विकासकामांचा भुमीपुजन करण्यात आला.
या विकासकामांच्या भुमीपूजन व लोकार्पण प्रसंगी माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, माजी प्राचार्य डॉ. देविदास जगनाडे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, बाजार समितीचे सभापती प्रभाकर सेलोकर, माजी नगराध्यक्षा रिता उराडे, माजी जि.प. सदस्य डॉ. राजेश कांबळे, माजी जि.प. सदस्य प्रमोद चिमुरकर, नगरपरिषदेचे माजी बांधकाम सभापती विलास विखार, शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष हितेंद्र राऊत, माजी न.प. सभापती महेश भर्रे, माजी पं.स. सदस्य थानेश्वर कायरकर, जिल्हा काॅंग्रेसचे उपाध्यक्ष मोंटु पिलारे, बाजार समितीचे संचालक प्रमोद मोटघरे, बाजार समितीचे संचालक किशोर राऊत, महीला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष मंगला लोनबले, महीला काँग्रेसच्या शहराध्यक्षा योगिता आमले, माजी नगरसेविका लता ठाकुर, सुधा राऊत, अमीत कन्नाके, प्रा.डि.के. मेश्राम, चंद्रशेखर गणवीर, नरेंद्र गाडगीलवार, मुन्ना रामटेके, सोमेश्वर उपासे यांसह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.
News - Chandrapur