एटीएसची मोठी कारवाई : मुंबईतून संशयित दहशतवाद्याला केली अटक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
महाराष्ट्र एटीएसने एक मोठी कारवाई करत मुंबईतून संशयित दहशतवाद्याला अटक केली आहे. या संशयित दहशतवाद्याला मुंबईतील वांद्रे परिसरातून अटक करण्यात आली आहे. गेल्या महिन्याभरात दहशतवाद्यांशी संबंधित मुंबईतील ही तिसरी अटक आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
अटक करण्यात आलेल्या संशयित दहशतवाद्याचे नाव मोहम्मद इरफान रेहमत अली शेख असे असल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी अटक करण्यात आलेल्या झाकीर या दहशतवाद्याच्या चौकशी नंतर एटीएसने मोहम्मद इरफान याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आणि त्यानंतर त्याला अटक केली आहे.
दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या सहा दहशतवाद्यांपैकी एक दहशतवादी हा मुंबईत राहणारा होता. त्यानंतर आता महाराष्ट्र एटीएसने मुंबईतून आणखी एका संशयित दहशतवाद्याला अटक केली. त्यानंतर आता वांद्रे परिसरातून आणखी एका संशयित दहशतवाद्याला अटक केल्याने एकच खळबळ उडाली आहे.  Print


News - Rajy | Posted : 2021-09-30
Related Photos