महत्वाच्या बातम्या

 जिल्हाधिकारी कार्यालय येथे ३ ऑक्टोबरला लोकशाही दिनाचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : सर्व जनतेस सुचित करण्यात येते की, जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथील सभागृहात सोमवार, 3 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी 3.00 वाजता लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर सभेच्या दिवशी तक्रार अर्ज स्विकारण्याची वेळ दुपारी 2.00 ते 3.00 वाजेपर्यत राहील आणि सभेला 3.00 वाजता सुरुवात होईल. ज्या तक्रारदारांना लोकशाही दिनात तक्रार अर्ज दाखल करावयाचा असल्यास, त्यांनी तालुका स्तरावरील लोकशाही दिनात दाखल केलेल्या तक्रारीचे निराकरण होवून प्राप्त झालेल्या अहवालावर समाधान न झाल्यास तालुका स्तरावरील प्राप्त अहवाल व टोकन क्रमांक जोडून जिल्हास्तरावर 3 ऑक्टोबर 2022 रोजी होणाऱ्या लोकशाही दिनात तक्रार अर्ज विहित नमुन्यात (प्रपत्र-1 अ ते 1 ड) दोन प्रतित दाखल करणे आवश्यक राहिल. तसेच तक्रार/ निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावी. अन्यथा अर्ज विचारात घेण्यात येणार नाही असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा लोकशाही दिन, गडचिरोली यांनी कळविले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos