वरोरा : बँकेचा अधिकारी बोलतो ची बतावणी करून बँक खात्यातून ७० हजार पळविले
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / वरोरा : तुमच्या एसबीआय डिटेन अकाउंट मधून एक हजार आठशे रुपये कटले आहे. तुमचे क्रेडिट कार्ड हे बंद झाले नसून चालूच आहे. त्याची प्रोफाइल फी कटली आहे. ॲप्स डाऊनलोड करा मी बँकेचा अधिकारी बोलतो असे बोलून ॲप्स डाऊनलोड होताच वरोरा येथील एका बँक खात्यातून 70 हजार ऑनलाईन पळवले गेले. ही घटना ३ आक्टोंबर रोजी घडली.
वरोरा शहरातील कमला नेहरू वार्डातील रहिवासी श्रीकांत रमेशचंद्र रहाटे यांच्या भ्रमणध्वनीवर कॉल आला. त्यात एसबीआय डिटेल अकाउंट मधील अठराशे रुपये कटले आहे. तुमचे क्रेडिट कार्ड हे बंद नसून चालू आहे तुम्हाला ते परत हवे असेल तर तुम्ही ए.एन.वाय.डी.एस.के. आरबीआय हा ॲप्स डाऊनलोड करा मी आरबीआयचा अधिकारी बोलतो अशी बतावणी केली. श्रीकांत रहाटे यांनी ॲप्स डाऊनलोड करताच त्यांच्या एसबीआय वरोरा येथील बँक खात्यातून तात्काळ पन्नास हजार, वीस हजार रुपये काढल्याचा भ्रमणध्वनीवर मेसेज आला. त्यामुळे गोंधळलेल्या श्रीकांत राहटे यांनी तातडीने कस्टमर केअरला भ्रमणध्वनी करून बँक खाते बंद केल्याने त्यांच्या बँक खात्यातील उर्वरित रक्कम सुरक्षित राहिल्याचे मानले जात आहे. याबाबत श्रीकांत रहाटे यांनी वरोरा पोलिसात तक्रार केली आहे.
News - Chandrapur