महत्वाच्या बातम्या

 अज्ञात कारच्या धडकेत महिला ठार : चालक गाडी सोडून फरार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : अज्ञात चारचाकी वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार महिला हिरकन्या लक्ष्मण खोब्रागडे वय ७०, रा. जेवनाळा यांचा मृत्यू झाला. तर संजय सुर्यभान रामटेके वय ४७, रा. जाभंळी/संडक हे जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित दुचाकीस्वार आपल्या कामानिमित्त जात असताना भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की महिला गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या अपघातात संजय रामटेके हे देखील जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर कार चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. दरम्यान, अपघातग्रस्त चारचाकी वाहन काही अंतरावर पलटी झालेल्या अवस्थेत आढळून आले. चालक वाहन सोडून फरार झाल्याने पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos