विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याकडून चहांदे कुटुंबीयांचे सांत्वन


- ट्रकच्या धडकेत समीक्षा चहांदे चा झाला होता दुर्दैवी मृत्यू
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : ब्रह्मपुरी तालुक्यातील मालडोंगरी येथील कु. समीक्षा संतोष चहांदे (१७) ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालय येथे ११ वीत शिक्षण घेत होती. १२ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ११.३० वाजताचे सुमारास सायकलने कॉलेजमध्ये जात असताना ट्रकने धडक दिली व मागील चाकात येऊन तिचा दुर्दैवी अंत झाला. घटनेच्या दुसऱ्या दिवशी विरोधी पक्ष नेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी घटनास्थळी पाहणी करून रस्त्यालगतचे पोल हटवून विद्यालयीन विद्यार्थ्यांना सुरक्षितता प्रदान करणे हेतू गतिरोधक व रस्ता रुंदीकरण तथा वाहतूक शिपाई तैनात करण्याचे लगेच आदेश दिले. या घटनेने मालडोंगरी येथील चहांदे कुटुंबीयांवर दुःखाचे डोंगर कोसळल्याने काल १५ जानेवारी रोजी मालडोंगरी येथे जाऊन चहांदे कुटुंबीयांची राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले. झालेली घटना अत्यंत दुर्दैवी असून मनाला चटका लावणारी आहे.
कुटुंबातील तरुण आणि हुशार मुलगी गेल्याने चहांदे कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. चहांदे कुटुंबावर आलेल्या या कठीण प्रसंगी मी व माझे सर्व सहकारी त्यांच्या सोबत आहोत. पुढील सर्व कारवाईसाठी आवश्यक ती मदत आणि सहकार्य कुटुंबाला उपलब्ध करून देईल, असे यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
याप्रसंगी प्रामुख्याने माजी जि.प. सभापती डॉ. राजेश कांबळे, ब्रह्मपुरी नगरपरिषद गटनेता विलास विखार, ब्रह्मपुरी काँग्रेस शहराध्यक्ष हितेंद्र राऊत, माजी जि.प. सदस्या स्मिता पारधी, सरपंच मंजूषा ठाकरे, माजी सरपंच राजेश पारधी, उपसरपंच विनोद घोरमोडे, माजी न.प. उपाध्यक्ष बंटी श्रीवास्तव, विशाल सहारे, प्रामुख्याने उपस्थित होते.
News - Chandrapur