महत्वाच्या बातम्या

 वाकडी येथील वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या महिलेच्या कुटुंबियांची भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांच्याकडून सांत्वनपर भेट


- मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या दाट झुडपी झाडे तोडण्याच्या वन अधिकाऱ्यांना दिले सूचना

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : तालुक्यातील मौजा- वाकडी येथील सदर महिला स्व. मंगला विठल बोडे रा. वाकडी ता. जि. गडचिरोली (५४) येथील रहिवासी असून सदर महिला काल ०३ जानेवारी २०२४ ला दुपारी २.०० वाजताच्या दरम्यान सरपण गोळा करण्यासंबंधित जंगलात गेली असताना अचानकपणे वाघाने तिच्यावर हल्ला करून जागीच ठार केले.

या सदर घटनेची माहिती जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांना मिळताच लगेचच त्यांनी ठार झालेल्या महिलेच्या कुटुंबियांची सांत्वन भेट दिले.

जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त करतांना महिन्या भरात ही दुसरी घटना आसून या घटनेमुळे सभोवतालच्या परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे नरभक्ष वाघाला लवकरात लवकर जेरबंद करा, असे निर्देश जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनी द्वारे दिल्या. 

मुख्य रस्त्यापासून वाकडी हा गाव एक- दोन किलोमीटर असून गावातील नागरिक, शाळकरी मुले व गडचिरोली ला कामाकरिता जाणारे कामगार हे वाकडी फाट्यापासून ते वाकडी पर्यंत पाई जात असतात.

परंतु मुख्य रस्त्यापासून ते वाकडे पर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला दाट झुडपी जंगल असून त्यांच्या मध्ये भीतीचा वातावरण तयार झालेला ते झुडपी जंगल लवकरात लवकर दहा ते पंधरा मीटर अंतरा पर्यंत साप करावे असे सूचना वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनी द्वारे दिल्या. 

यावेळी बंडू झाडे तालुका महामंत्री, रवींद्र भोयर तालुका सचिव, चरणदास बोरकुटे माजी सरपंच, ऋषिजी भोयर माजी तंटामुक्ती अध्यक्ष, वासुदेव आभारे घारगव, कुमदेव बोडे, टिंकुजी बोडे शहर महामंत्री व प्रतिष्ठित नागरिक व परिवारातील महिला उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos