रेल्वेसाठी २.४० लाख कोटीची तरतूद : अर्थमंत्र्यांची घोषणा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी भारताला वंदे भारत २.० हायड्रोजन ट्रेनची भेट दिली आहे. यासोबतच यंदाच्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी २.४० लाख कोटी रुपयांची तरतूद केल्याचेही त्यांनी जाहीर केले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केले. या अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. २०१३ सालचा विचार करता नऊ पटीने बजेट वाढवल्याचे निर्मला सीतारमण यांनी सांगितले.
रेल्वेमध्ये खासगी क्षेत्राचा सहभाग वाढवण्याची घोषणाही अर्थमंत्र्यांनी केली आहे. तसेच रेल्वेमध्ये १०० नवीन महत्त्वाच्या योजना लागू करणार असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले.
दरम्यान अर्थसंकल्पीय भाषणाची सुरुवात करताना निर्मला सीतारमण म्हणाल्या की, जगाने भारतीय अर्थव्यवस्थेला एक चमकता तारा मानले आहे. जगात भारताचा मान वाढला आहे. भारतीय अर्थव्यवस्था योग्य दिशेने वाटचाल करत आहे आणि उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करत आहे. त्या म्हणाले की, कोरोनाच्या काळात कोणीही उपाशी झोपणार नाही याची काळजी घेतले. सरकारने २ लाख कोटी रुपये खर्च करून प्रत्येक व्यक्तीला अन्नधान्य दिले. ८० कोटी लोकांना २८ महिन्यांसाठी मोफत रेशनची व्यवस्था करण्यात आली.
२०१३-१४ च्या तुलनेत यंदा रेल्वेसाठी नऊ पट अधिक वाटप
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०२३ चा अर्थसंकल्प सादर करताना सांगितले. रेल्वेवर आतापर्यंतचा सर्वाधिक खर्च केला जाईल, अशी घोषणा त्यांनी केली. या आर्थिक वर्षात रेल्वेसाठी २.४० लाख कोटी रुपये खर्च होणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेसाठी आतापर्यंतची ही सर्वाधिक तरतूद आहे. २०१३-१४ च्या तुलनेत हे नऊ पटीने जास्त वाटप असल्याचे त्यांनी सांगितले.
रेल्वे बजेटबाबत बोलताना अर्थमंत्री काय म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार संपूर्ण रेल्वे प्रणालीच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी रेल्वे बजेटमध्ये 20-25 टक्क्यांनी वाढ करण्यावर काम करत आहे, असं निर्मला सीतारमण यांनी सांगितलं. मागील अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गती शक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅनवर लक्ष केंद्रित केले होते.
यंदाच्या अर्थसंकल्पातही यालाच सरकारचे प्राधान्य राहणार आहे असल्याचं त्या म्हणाल्या की, या वर्षी, रेल्वेला देण्यात येणारा निधी नवीन ट्रॅक टाकण्यासाठी, अर्ध-हाय-स्पीड वंदे भारत गाड्यांची संख्या वाढवण्यासाठी, हायड्रोजनवर चालणाऱ्या गाड्या तसेच अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी जाईल, असे अर्थमंत्री यांनी जाहीर केले.
यंदा २ लाख ३५ हजार कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची अपेक्षा
२०२२-२३ मध्ये, वृद्धांना भरघोस अनुदानासह प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या बहुतांश सवलती बंद केल्यानंतर रेल्वेने मोठ्या प्रमाणात बचत केली होती. तसेच मार्गांच्या विद्युतीकरणामुळेही बचत झाली होती. मागील आर्थिक वर्षातील याच कालावधीच्या तुलनेत २०२२-२३ मध्ये आतापर्यंत ४१ हजार कोटी रुपयांचा अधिक महसूल कमावल्याचे रेल्वेने म्हटले आहे. भारतीय रेल्वेला या आर्थिक वर्षात एकूण रु. २ लाख ३५ हजार कोटी महसूल मिळण्याची अपेक्षा आहे.
News - Rajy