अफगाणिस्तानच्या उपराष्ट्रपतिपदावर असलेल्या अमरुल्लाह सालेह यांनी स्वतःला कार्यकारी राष्ट्रपती म्हणून केले घोषित


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / काबुल :
अफगाणिस्तानच्या चालू संघर्षासंदर्भात मोठी घडामोड समोर आली आहे. उपराष्ट्रपतिपदावर असलेल्या अमरुल्लाह सालेह यांनी स्वतःला राष्ट्रपती घोषित करत सत्तेवर दावा केला आहे. सालेह कार्यकारी राष्ट्रपती असतील. त्यांनी ट्वीट करत ही घोषणा केली. आपल्या समर्थनार्थ ते काही गटांना एकत्र करत आहेत.
अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष असणारे अश्रफ गनी अगोदरच देश सोडून गेले आहेत. तालिबान काबुलपर्यंत पोहोचत आहेत हे लक्षात येताच देशाच्या सुरक्षा सल्लागारांसह गनी देश सोडून पसार झाले. त्यांचा ठावठिकाणी देशाला माहीत नाही. अशात तालिबान्यांनी अफगाणिस्तानची राजधानी काबुलवर ताबा मिळवला. आता मात्र उपराष्ट्राध्यक्ष पदावर असणाऱ्या अमरुल्लाह सालेह यांच्या ट्वीटने घडामोडींना कलाटणी मिळत आहे. आपण देश सोडलेला नाही. देशातच आहोत. काळजीवाहू राष्ट्राध्यक्ष म्हणून आपण काम पाहणार असे  सालेह यांनी जाहीर केले आहे.
  Print


News - World | Posted : 2021-08-18Related Photos