महानाटय जानता राजा चा प्रयोग ६ ते ८ फेब्रुवारीला सादर करण्यात येणार : खासदार रामदास तडस यांची माहिती


- वर्धा येथील स्वावलंबी विद्यालयाच्या प्रांगणावर महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठाण पुणे व्दारा छत्रपती शिवाजी महाराज महानाटय जानता राजा चे प्रयोग होणार
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : महाराष्ट्र सरकार व्दारा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या ३५० वर्षपूर्तीनिमित्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची, नीतीची, चरित्राची, विचारांची माहिती जनसामान्यांना व्हावी. यासाठी संपुर्ण महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारीत महानाटयाच्या प्रयोगाचे आयोजन करण्याचे निश्चीत करण्यात आलेले आहे. त्या अनुषंगाने वर्धा जिल्हयातील स्वावलंबी विद्यालयाचे प्रांगन वर्धा येथे ०६ फेब्रुवारी ते ०८ फेुब्रुवारी २०२४ पंर्यत सायं ०६.३० ते रात्री ०९.४५ पंर्यत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारीत महानाटय जानता राजा चे तीन दिवस तीन प्रयोग सादर करण्यात येणार असल्याची माहिती खासदार रामदास तडस यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे माहिती दिली.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या ३५० वर्षपूर्तीनिमित्य छत्रपती शिवाजी महाराज महानाटय कार्यक्रमाची जबाबदारी जिल्हा प्रशासनास देण्यात आली असुन, जिल्हाधिकारी वर्धा व्दारा कार्यक्रमाचे नियोजन झालेले असुन महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठाण पुणे व्दारा छत्रपती शिवाजी महाराज महानाटय जानता राजा चे ०६ फेब्रुवारी ते ०८ फेुब्रुवारी २०२४ पंर्यत सायं ०६.३० ते रात्री ०९.४५ पंर्यत तीन दिवस तीन प्रयोग सादर करण्यात येणार आहे. स्वावलंबी विद्यालयाच्या प्रागंणावर आसनक्षमता आठ हजार असणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, विचार आणि न्यायप्रियता पिढ्यानपिढ्या प्रेरणा देत राहिली आहे. त्यांची धाडसी कार्य शैली, युद्धनैपुण्य, शांततामय राजनैतिक प्रणाली आजही आपल्यासाठी प्रेरणादायी आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या ३५० वर्षपूर्तीनिमित्य छत्रपती शिवाजी महाराजाचे महानाटय वर्धेत होणार आहे ही अभिमानाची बाब आहे, या छत्रपती शिवाजी महाराजाचे महानाटयाचे प्रयोगाचा आस्वाद घेण्याचे आवाहन खासदार रामदास तडस यांनी केले व महाराष्ट्र सरकारने छत्रपती शिवाजी महाराज यांचे महानाटय जानता राजा प्रयोगाकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजीत पवार व सांस्कृतिक मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले.
News - Wardha