महत्वाच्या बातम्या

 देसाईगंज : युवतीची गळफास घेऊन आत्महत्या


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

शहर प्रतिनिधी / देसाईगंज : येथील आंबेडकर वॉर्डमधील युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १२ डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली. सदर घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. 

कल्पना केशव शिवूरकर (२५) असे मृत युवतीचे नाव आहे. युवतीच्या घरातील एका खोलीत धान ठेवले होते. धानाच्या ढिगावर चढून व त्यावर खुर्ची ठेवून गळफास घेतल्याची माहिती प्राप्त झाली आहे. ही घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली. तिचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. मंगळवारी शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. देसाईगंज पोलिस स्टेशनमध्ये मर्ग दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुजाता भोपळे करीत आहेत. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.

  Print


News - Gadchiroli
Related Photos