महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


३ सप्टेंबर महत्वाच्या घटना

३०१: ३०१ई.पूर्व : जगातील सर्वात जुने प्रजासत्ताक राष्ट्र सॅन मरीनो स्थापित झाले.

१७५२ : अमेरिकेत ग्रेगरियन कॅलेंडरचा वापर सुरू झाला.

१९१६ : श्रीमती अॅनी बेझंट यांनी होमरुल लीगची स्थापना केली.

१९३५ : सर मॅल्कम कॅम्पबेल ताशी ३०० मैल पेक्षा जास्त जोरात ऑटोमोबाईल चालवणारे पहिले व्यक्ति झाले.

१९७१ : कतारला स्वातंत्र्य मिळाले.

२०२२ : आर्टेमिस १ रॉकेट - इंधन गळतीमुळे दोन तासांपेक्षा जास्त उशीर झाल्याने नासाने आर्टेमिस १ रॉकेटचे प्रक्षेपण दुसऱ्यांदा स्थगित केले.

३ सप्टेंबर जन्म

१८५५ : आध्यात्मिक गुरू पंत महाराज बाळेकुंद्री यांचा जन्म. (मृत्यू: १६ ऑक्टोबर १९०५)

१८६९ : सेंद्रिय पदार्थांच्या पृथक्करणासाठी रसायनशास्त्राचा नोबेल पारितोषिक मिळवणारे ऑस्ट्रियन शास्त्रज्ञ फ्रिट्झ प्रेग्ल यांचा जन्म. (मृत्यू: १३ डिसेंबर १९३०)

१८७५ : पोर्श्या मोटार कंपनी चे संस्थापक फर्डिनांड पोर्श्या यांचा जन्म. (मृत्यू: ३० जानेवारी १९५१)

१९०५ : नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ कार्ल डेव्हिड अँडरसनयांचा जन्म.

१९२३ : प्रख्यात तबलावादक किशन महाराज यांचा जन्म. (मृत्यू: ४ मे २००८)

१९२३ : टाको बेल चे संस्थापक ग्लेन बेल यांचा जन्म. (मृत्यू: १६ जानेवारी २०१२)

१९२३ : महाराष्ट्र शाहीर कृष्णराव तथा शाहीर साबळे यांचा जन्म.

१९२७ : बंगाली व हिन्दी चित्रपट अभिनेते अरुण कुमार चटर्जी तथा उत्तम कुमार यांचा जन्म. (मृत्यू: २४ जुलै १९८०)

१९३१ : नाटककार श्याम फडके यांचा जन्म.

१९३८ : नोबेल पारितोषिक विजेते जपानी रसायनशास्त्रज्ञ रायोजी नोयोरी यांचा जन्म.

१९४० : लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीतील संगीतकार प्यारेलाल शर्मा यांचा जन्म.

१९५६ : भारतीय अभिनेते आणि दिग्दर्शक जिझु दासगुप्ता यांचा जन्म. (मृत्यू: २१ डिसेंबर २०१२)

१९६५ : अमेरिकन अभिनेता चार्ली शीन यांचा जन्म.

१९७१ : भारतीय-अमेरिकन लेखक किरण देसाई यांचा जन्म.

१९७४ : भारतीय क्रिकेटपटू राहुल संघवी यांचा जन्म.

१९७६ : चित्रपट अभिनेता विवेक ओबेरॉय यांचा जन्म.

१९४८ : झांबिया देशाचे ३रे राष्ट्रपती, वकील आणि राजकारणी लेवी मवानवासा यांचा जन्म (मृत्यू : १९ ऑगस्ट २००८)

१९४२ : भारतीय अभिनेते निपॉन गोस्वामी यांचा जन्म (मृत्यू : २७ ऑक्टोबर २०२२)

१९३५ : भारतीय शेतकरी आणि राजकारणी शरद अनंतराव जोशी यांचा जन्म (मृत्यू : १२ डिसेंबर २०१५)

१९२८ : लक्झेंबर्ग देशाचे २०वे पंतप्रधान, न्यायशास्त्रज्ञ आणि राजकारणी गेस्टन थॉर्न यांचा जन्म (मृत्यू : २६ ऑगस्ट २००७)

१७२८ : इंग्लिश व्यापारी आणि अभियंते, बोल्टन आणि वॅटचे सह-संस्थापक मॅथ्यू बोल्टन यांचा जन्म (मृत्यू : १७ ऑगस्ट १८०९)

३ सप्टेंबर मृत्यू

१६५८ : इंग्लंडचा राज्यकर्ता ऑलिव्हर क्रॉमवेल यांचे निधन.

१९४८ : चेकोस्लोव्हेकियाचे दुसरे राष्ट्राध्यक्ष एडवर्ड बेनेस यांचे निधन.

१९५३ : तबला, घुमट व सारंगीवादक लक्ष्मण तथा खाप्रुमामा पर्वतकर यांचे निधन.

१९५८ : निसर्गकवी माधव केशव काटदरे यांचे निधन. (जन्म: ३ डिसेंबर १८९२)

१९६७ : वार्ताहर, संपादक अनंत हरी गद्रे तथा समतानंद यांचे निधन. (जन्म: १६ ऑक्टोबर १८९०)

१९९१ : अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक फ्रँक काप्रा यांचे निधन.

२००० : स्वातंत्र्यसैनिक, गोवा विधानसभेचे पहिले सभापती पांडुरंग पुरुषोत्तम शिरोडकर यांचे निधन.

२०१४ : भारतीय राजकारणी ए. पी. वेंकटेश्वरन यांचे निधन. (जन्म: २ ऑगस्ट १९३०)

२००७ : अमेरिकन वैमानिक, ग्लोबल फायर या फुग्यातून पॅसिफिक महासागर एकट्याने उड्डाण करून न थांबता ओलांडणारे पहिले व्यक्ती स्टीव्ह फॉसेट यांचे निधन (जन्म: २२ एप्रिल १९४४)

२००५ : अमेरिकन वकील आणि कायदेतज्ज्ञ, अमेरिका देशाचे १६वे मुख्य न्यायाधीश विल्यम रेहनक्विस्ट यांचे निधन (जन्म: १ ऑक्टोबर १९२४)





  Print






Related Photos