हर घर नल-हर घर जल योजनेंतर्गत नागरिकांना पाण्याच्या समस्येतून मिळणार सुटका : आमदार विनोद अग्रवाल
- सोनपुरीत 2 कोटी 47 लाखांच्या कामांचे भूमिपूजन व उद्घाटन आमदार विनोद अग्रवाल यांच्या हस्ते संपन्न
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया : विधानसभेच्या सोनपुरी गावात 2 कोटी 47 लाख रुपयांच्या कामांचा भूमिपूजन व उद्घाटन समारंभ आमदार विनोद अग्रवाल यांच्या हस्ते संपन्न झाला.व या कार्यक्रमामध्ये उपस्थित सभापती मुनेश रहांगडाले म्हणाले की, आपल्याला सक्षम नेतृत्वाचे नेते व विकासपुरुष लाभले आहेत, ज्यांच्या कार्यात आपले क्षेत्रामध्ये सुफलाम सुजलाम,होत आहेत अशा प्रशंसनीय शब्दात जनतेला मार्गदर्शन केले.
आ. विनोद अग्रवाल याप्रसंगी संकल्पित योजनांची माहिती देताना, बोलले की शेतकऱ्यांना धान विकण्याचे स्वातंत्र्य, कृषी गोदाम, ७/१२ ऑनलाइन, सिटी सर्वे, पांदन रस्ता पर खड़ीकरण, ४० हजार पेक्षा गरजूंना राशन, आवास योजना चा लाभ, महिला बचत गट भवन, वाचनालय करीता पाठ्यक्रम चांगले रस्ते बांधणे, देवस्थान, समाज भवन बांधणे, शाळांच्या गुणवत्तेसाठी विकासकामे, नुकसानग्रस्तांना वळिव मदत, डांगोर्ली बंधाऱ्याच्या बांधकामाला मंजुरी, अशा अनेक विकासकामांची कामे आमदार विनोद अग्रवाल यांनी करून घेतली. व आ.विनोद अग्रवाल यांनी सर्वांचे श्रेय जनतेला देत सोनपुरी गावातील रहिवाशांमुळेच हे शक्य झाले आहे, मी तुम्हा सर्वांच्या प्रेमाचा सदैव ऋणी राहीन व मित्र भाऊ आणि मुलगा, म्हणून जनतेची सेवा करत राहीन असे सांगितले तसेच आमदार विनोद अग्रवाल यांनी बोलता इतर मंजूर कामांची माहिती दिली.
या दरम्यान आ.विनोद अग्रवाल, भाउराव उके अध्यक्ष जनता की पार्टी,मुनेश रहांगडाले सभापती, प. स.गोंदिया, विक्की बघेले युवानेता, राखी लेखराम ठाकरे, सरपंच सिलाबाई पटले उपसरपंच, दिनेश वैद्य, भारती ठाकरे, सरिता रिनायत, मीराबाई चौधरी, होमेंद्र ठाकुर, राजेश पटले, जी.एस ठाकुर ग्रामसेवक, लेखराम ठाकरे, गयेंद्र ठाकरे, तालुका समन्वयक उमेद अभियान, इत्यादी कार्यकर्त्ते व गणमान्य नागरिक गण उपस्थित होते.
News - Gondia