आता मुलींनाही देता येणार एनडीएची प्रवेश परीक्षा : सर्वोच्च न्यायालय


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
आता देशाच्या सुरक्षेसाठी सैन्यदलात भरती होऊ इच्छिणाऱ्या मुलींसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलासा देणारा निकाल जाहीर केला आहे. एनडीए म्हणजेच, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची दारे आता मुलींसाठीही खुली होणार आहेत. एनडीएची प्रवेश परीक्षा मुलींनाही देता येणार आहे. या निर्णयाने सर्वोच्च न्यायालयाने देशभरातील मुलींना मोठा दिलासा दिला आहे. ५ सप्टेंबरला एनडीएची प्रवेश परीक्षा आहे आणि पहिल्यांदाच मुलींनाही ही परीक्षा देता येणार आहे.
दिल्लीतील वकील कुश कालरा यांनी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. या याचिकेत त्यांनी पदवीनंतरच महिलांना सैन्यात भरती करण्याची परवानगी आहे. त्यांच्यासाठी किमान वयही २१ वर्षे ठेवण्यात आले आहे. तर मुले मात्र बारावीनंतरच एनडीएमध्ये प्रवेश घेऊ शकतात, असे  म्हटले होते. केवळ महिला असल्यानं लिंगभेद करुन त्यांना एनडीएत प्रवेश नाकारणे हा त्यांच्या मुलभूत अधिकारांवर हल्ला आहे, असेही या जनहित याचिकेत म्हटले होते.  
न्यायालयाने केंद्र सरकारला या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले होते. न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि हृषिकेश रॉय यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी केली.
  Print


News - World | Posted : 2021-08-18


Related Photos