काँग्रेसला मते देऊन जनता अमुल्य मत व्यर्थ घालवणार नाहीत : माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराजांनी व्यक्त केला विश्वास
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी : देवलमरी येथुन माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज यांनी प्रचाराला सुरुवात केली. केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार येणार असल्याचे माहीत असुनही कोणीही काँग्रेसला मतदान करण्याचा मुर्खपणा सुज्ञ मतदार करणार नाही, असा विश्वास प्रचारसभेत बोलतांना व्यक्त केला.
पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात सुरु असलेला विकासाचा रथ अधीक वेगाने धावावा. यासाठी भाजपला मतदान करुन मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार अशोक नेते यांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचे राजेंनी जनतेला आवाहन केले. नागरीकांनी सुध्दा आपल्या व्यथा राजे यांच्या समोर मांडल्या आणि केवळ आपणच आशेचा किरण असल्याचा विश्वास व्यक्त केला.
News - Gadchiroli