महत्वाच्या बातम्या

 विष प्राशन केलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : सालेकसा पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या ग्राम ब्राह्मणटोला येथील एका २५ वर्षीय तरुणाचा विष प्राशन केल्यानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ब्राह्मणटोला येथील सुरेंद्र कैलाश सुलाखे (वय २५) यांनी शनिवारी ६ आपल्या राहत्या घरी विष प्राशन केले होते. त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने कुटुंबीयांनी त्यांना तातडीने सालेकसा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले होते.

वैद्यकीय महाविद्यालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना सोमवारी ८ मध्यरात्री सुमारे १.३० वाजताच्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या प्रकरणी सालेकसा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे. विष प्राशन करण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलिस विविध अंगांनी चौकशी करीत आहेत. तरुणाच्या निधनामुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात शोककळा पसरली आहे.





  Print






News - Gondia




Related Photos