महत्वाच्या बातम्या

 अपर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे उद्या भंडारा जिल्हाच्या दौऱ्यावर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : महाराष्ट्र शासनाचे अपर मुख्य सचिव (महसूल) मा. विकास खारगे हे शुक्रवार, ३१ जुलै २०२६ रोजी भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, महसूल विभागाच्या विविध कार्यालयांना भेटी देऊन कामकाजाचा आढावा घेणार आहेत. तसेच जिल्ह्यातील उपजिल्हाधिकारी, सह निबंधक (नोंदणी व मुद्रांक), उप अधीक्षक भूमी अभिलेख आदी अधिकाऱ्यांसोबत विविध विषयांवर आढावा बैठक घेणार आहेत.

दौऱ्याची सुरुवात सकाळी ९.३० वाजता उपअधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालय, भंडारा येथील भेटीने होईल. त्यानंतर १०.३० वाजता तहसील कार्यालय, मोहाडी, ११.१५ वाजता सेतू केंद्र, मोहाडी, १२.०० वाजता आंधळगाव (ता. मोहाडी), १.०० वाजता उप निबंधक (मुद्रांक) कार्यालय, तुमसर तसेच १.३० वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालय, तुमसर येथे भेटी देण्यात येणार आहेत.

यानंतर दुपारी २.३० वाजता भंडाऱ्याकडे प्रस्थान करून ३.०० वाजता विश्रामगृह, भंडारा येथे भोजन घेतील. सायंकाळी ४.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद कक्षात महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक होणार असून, सायंकाळी ६.०० वाजता नागपूरकडे प्रस्थान करतील.

 

 





  Print






News - Bhandara




Related Photos