जागतिक पुरुष नसबंदी पंधरवाडा कार्यक्रमाचे आयोजन
- 21 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर 2022 या कालावधीत आयोजन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : कुटुंब नियोजन हे केंद्र शासनाचे अत्यंत महत्वाचे धोरण आहे. मोठया प्रमाणात प्रगती झालेली असूनसुध्दा अद्यापही कुटुंब नियोनाची जबाबदारी बऱ्याचदा स्त्रीयांनाच पार पाडावी लागते. केंद्र शासनामार्फत कुटुंब नियोजनात पुरुषाच्या सहभागाला चालना देण्यासाठी तसेच पुरुष नसबंदी पध्दती जसे पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया, निरोधचा वापर यांचे प्रमाण वाढविण्याच्या हेतुने पुरुष नसबंदी पंधरवाडा दरवर्षी राज्यात साजरा करण्यात येतो.
पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया पंधरवडा 2022 राबविण्यात येत आहे. हा पंधरवडा 21 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर 2022 या कालावधीत सर्व आरोग्य संस्थामार्फत राबविण्यात येणार आहे.
आता पुरुष निभावतील जबाबदारी, कुटुंब नियोजनातील सहभागाने दाखवतील आपली भागीदारी या मोहिमेचे घोषवाक्य असून 21 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2022 या कालावधीत कुटुंब कल्याण कार्यक्रमाअंतर्गत उपलब्ध पध्दती, सेवा याबाबतच्या माहितीचा व कुटुंब नियोजन पध्दतीमध्ये पुरुषांचा सहभाग वाढविण्यासाठी आणि त्याच्याशी निगडीत गैरसमज दुर करण्यासाठी या बाबींचा प्रामुख्याने प्रचार व प्रसार करण्यात येईल. पुरुष नसबंदी पध्दतीचा अवलंब केलेल्या लाभार्थींमार्फत मोहिमेचा प्रचार व प्रसार करण्यात येईल. तालुक्यामध्ये गावोगावी कुटुंब नियोजन सेवांची माहिती देण्यासाठी मोबाईल व्हॅनचा उपयोग करण्यात येईल.
28 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर 2022 या कालावधीत आशा मार्फत घरोघरी जाऊन संतती नियमन साधनांचे वाटप करण्यात येईल. निरोध व तोंडावाटे घ्यावयाच्या गर्भनिरोधक गोळ्या यांचे अतिरीक्त पॅकेटस देण्यात येईल. जिल्ह्यातील सर्व कार्यान्वीत शस्त्रक्रिया गृह असणाऱ्या प्रा.आ.केंद्रामध्ये अतिरीक्त पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजन करण्यात येईल.
भंडारा तालुक्यात 28 नोव्हेंबर रोजी प्रा.आ.केंद्र, शहापूर, 29 नोव्हेंबर रोजी प्रा.आ.केंद्र, पहेला, 30 नोव्हेंबर रोजी प्रा.आ.केंद्र, धारगाव, 2 डिसेंबर रोजी प्रा.आ.केंद्र, खमारी, 3 डिसेंबर रोजी प्रा.आ.केंद्र, मोहदुरा, मोहाडी तालुक्यात 2 डिसेंबर रोजी प्रा.आ.केंद्र, वरठी, लाखणी तालुक्यात 29 नोव्हेंबर व 1 डिसेंबर रोजी प्रा.आ.केंद्र, सालेभाटा, 1 डिसेंबर रोजी प्रा.आ.केंद्र, पिंपळगाव, 29 नोव्हेंबर रोजी प्रा.आ.केंद्र, मुरमाडी, तुमसर तालुक्यात 1 डिसेंबर रोजी प्रा.आ.केंद्र, देव्हाडी, 2 डिसेंबर रोजी प्रा.आ.केंद्र, चुल्हाड, 28 नोव्हेंबर रोजी प्रा.आ.केंद्र, गोबरवाही, 30 नोव्हेंबर रोजी प्रा.आ.केंद्र लेंडेझरी, 29 नोव्हेंबर रोजी उप.जि.रु.तुमसर, 2 डिसेंबर रोजी ग्रा.रु.सिहोरा, साकोली तालुक्यात 28 नोव्हेंबर रोजी प्रा.आ.केंद्र, खांबा, 29 नोव्हेंबर रोजी प्रा.आ.केंद्र, सानगडी, 30 नोव्हेंबर रोजी प्रा.आ.केंद्र, गोंडउमरी, 1 डिसेंबर रोजी प्रा.आ.केंद्र, एकोडी, 2 डिसेंबर रोजी प्रा.आ.केंद्र, विर्शी, 2 डिसेंबर रोजी उप.जि.रु.साकोली, लाखांदुर तालुक्यात 30 नोव्हेंबर रोजी प्रा.आ.केंद्र, बारव्हा, 3 डिसेंबर रोजी प्रा.आ.केंद्र, कुडेगाव, 2 डिसेंबर रोजी ग्रा.रु.लाखांदुर,पवनी तालुक्यात 29 नोव्हेंबर रोजी प्रा.आ.केंद्र, सावरला, 2 डिसेंबर रोजी प्रा.आ.केंद्र, कोंढा, 2 डिसेंबर रोजी प्रा.आ.केंद्र, आसगाव, 2 डिसेंबर रोजी ग्रा.रु.अडयाळ व 2 डिसेंबर रोजी ग्रा.रू.पवनी येथे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी कळविले आहे.
News - Bhandara