देसाईगंज उपजिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन केव्हा?
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
शहर प्रतिनिधी / देसाईगंज : येथील उपजिल्हा रुग्णालयात देण्यात येणार्या सोयी सवलती व भौगोलीक परिस्थिती लक्षात घेता या रुग्णालयाच्या दर्जात वाढ करून १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय श्रेणीवर्धन करण्याची आवश्यकता आहे. एखादी दुर्घटना अथवा एखादा मोठा अपघात घडल्यास रुग्णांना उपचारार्थं येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात येते. सध्या येथील ग्रामीण रुग्णालयात ३० खाटांची व्यवस्था करण्यात आली असली तरी मध्यवर्ती ठिकाण असलेल्या ग्रामीण रुग्णालयात लगतच्या लाखांदूर, अर्जुनी/मोर, कुरखेडा, आरमोरी तालुक्यातील मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचारार्थ धाव घेत असल्याचे वास्तव असल्याने उपलब्ध सोयीसुविधा कमी पडू लागल्या आहेत. सदर रुग्णालयात केवळ ३० खाटा असल्याकारणाने रुग्णांना अपुऱ्या सोयीसुविधा मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे रुग्णांच्या व नातेवाईकांच्या मनात नाराजी आहे. सदर प्रकरणाकडे गंभीरतेने लक्ष देऊन उपजिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करावे अशी मागणी होत आहे.
News - Gadchiroli