मुन्ना तावाडे यांना उत्कृष्ट डिजिटल मीडिया पत्रकार पुरस्कार जाहीर
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपुर : माहिती अधिकार पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेना इंडिया २४ न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा उत्कृष्ट डिजिटल मीडिया पत्रकार पुरस्कार इंडिया दस्तक न्युज टीव्हीचे संस्थापक संपादक मुन्ना तावाडे यांना जाहीर करण्यात आला आहे.
मुन्ना तावाडे यांना उत्कृष्ट डिजिटल मीडिया पत्रकार पुरस्कार माहिती अधिकार पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेना इंडिया २४ न्यूज यांच्या वर्धापन दिन व महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार सत्कार सोहळ्याच्या प्रसंगी ठेऊन गौरविण्यात येणार आहे. सदर कार्यक्रम चंद्रपूर येथील कर्मवीर दादासाहेब मा.सा. कन्नमवार सभागृहात ५ मार्च २०२३ रोजी आयोजीत केला गेला आहे.
मुन्ना तावाडे हे सध्या पुरोगामी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडत असून सोबतच समाज समता संघाचे जिल्हाध्यक्ष म्हणून सामाजिक उपक्रमात सक्रिय आहेत. ते गेल्या अनेक वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून आपल्या पत्रकारितेतून त्यांनी वंचितांच्या प्रश्नांना वाचा फोडली आहे. तावाडे यांना उत्कृष्ट डिजिटल मीडिया पत्रकार पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
News - Chandrapur