कियर येथे सभा मंडपाचे होणार बांधकाम : माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड : तालुक्यातील आरेवाडा ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या अतिदुर्गम व आदिवासीबहुल कियर येथे सुसज्ज सभा मंडप बांधकाम केले जाणार असून नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
आरेवाडा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या कियर गावात विविध सभा आणि सामाजिक कार्यक्रमासाठी सभा मंडप बांधकाम करण्याची मागणी मागील भेटी दरम्यान माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्याकडे स्थानिकांनी केली होती. दरम्यान भाग्यश्री आत्राम यांनी गावात सभा मंडप बांधकाम करून देण्याची ग्वाही दिली होती. ही मागणी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडे रेटून धरून तब्बल १० लाखांची निधी खेचून आणली. या कामाला प्रशाकीय मान्यता मिळताच त्यांनी कियर गावाला भेट देऊन भूमिपूजन करत त्वरित कामाला सुरुवात करण्याचे निर्देश दिले.
भाग्यश्री आत्राम यांनी दिलेला शब्द पाळल्याने कियर वासीयांची मोठी अडचण दूर झाली असून गावकऱ्यांनी त्यांचे आभार मानले. या भूमिपूजन प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते अरुण मुक्कावार, सेवानिवृत्त प्राचार्य रतन दुर्गे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येरावार, पाटील सोमा बोगामी, भूमीया राजू दूर्वा, बैसू वाचामी, धनसिंग मडावी, दशरथ पुंगाटी, बिरजू कूळयेटी, मंगरू तेलामी, मारू पदा, रमेश पदा, गोंगलु तेलामी तसेच महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
News - Gadchiroli