महत्वाच्या बातम्या

 माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केली महागाव येथील मेश्राम परिवाराला आर्थिक मदत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / अहेरी : तालुक्यातील महागाव खुर्द येथील मेश्राम परिवाराला काँग्रेस नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी आर्थिक मदत केले.

महागाव खुर्द येथील नारायण मेश्राम यांना लखवा मारला. घराचा कर्ताधरता व्यक्ती अपंग झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांवर आर्थिक संकट कोसडले. सदर बाब आविसं काँग्रेसचे नेते व माजी जि.प. अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांना कळताच त्यांनी परिस्तिथी जाणून घेतली व त्यांना मदतीचा हात म्हणून आर्थिक मदत केली व त्यांना आर्थिक संकटातून सावरले.

यावेळी बाळू भोगामी तालुका काँग्रेस अध्यक्ष भामरागड, सुधाकर तिमा, राजू दुर्गे, गणेश चौधरी, श्रीनिवास आलम, कार्तिक तोगम मरपल्ली माजी उपसरपंच, प्रमोद गोडसेलवार, गुरुदास दुर्गे, लिंगेश दहागावकर, लक्ष्मण चींतावार सह परिसरातील आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos