ब्रम्हपुरी : पन्नास वर्षीय महिलेने प्रेमात अडसर ठरणाऱ्या ६५ वर्षीय पतीचा काढला काटा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / ब्रह्मपुरी : ब्रह्मपुरी शहरात एका पन्नास वर्षीय महिलेने प्रेमात अडसर ठरणाऱ्या 65 वर्षीय पतीची तीन महिन्यापूर्वी हातपाय बांधून आणि तोंड दाबून हत्या केली. यानंतर हृदयविकाराने पतीचा मृत्यू झाल्याचे नातेवाईकांना सांगितले. अंत्यसंस्कार पार पडला, मात्र तीन महिन्यानंतर आईचा भ्रमणध्वनी विवाहित मुलीच्या हातात पडला. यातील आई आणि तिच्या प्रियकराचे संभाषण ऐकून तिला धक्काच बसला. आईनेच प्रियकरला सोबत घेऊन वडीलाची हत्या केल्याची बाब उजेडात येतात तिने पोलीस स्टेशनला तक्रार दिली आणी तीन महिन्यापूर्वीच्या हत्याकांडला वेगळी कलाटनी मिळाली.
पंचवीस वर्षीय मुलगी श्वेता रामटेके हिने याबाबत तक्रार दिली. तिच्या तक्रारीनुसार श्वेता ही नागपूरात खाजगी नोकरी करीत आहे. तर ब्रह्मपुरीत तिचे वडील, आई आणि लहान बहिण असे कुटुंब राहत होते. वडील वनविभागातून सेवानिवृत्त झाले होते. आई गावातच जनरल स्टोअर्स चालवीत होती. दुकानाजवळच 45 वर्षीय मुकेश त्रिवेदी याचे भाजीपाला व बांगड्याचे दुकान आहे. त्रिवेदी यांचे रामटेके यांच्या घरी सतत येणे जाणे होते. सहा ऑगस्ट रोजी श्वेता आणि तिची लहान बहीण दोघी ही नागपूरला होत्या. याच दरम्यान त्यांना वडिलांच्या निधनाचे बातमी मिळाली. हृदयविकाराने वडील मृत्यू पावल्याचे त्यांना सांगण्यात आले होते. वडील 65 वर्षाचे असल्याने त्यांच्या आकस्मिक मृत्यूची शक्यता गृहीत धरून मुलींनी फार विचारपूस केली नाही. परंतु वडिलांच्या मृत्यूनंतर आठवडाभरात आईच्या वागणुकीत मुलींना बदल दिसू लागला. वडिलांच्या निधनानंतर मुकेश त्रिवेदी यांचे घरी येणे जाणे वाढले. मुलींनी अनेकदा आईला समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु ती मुकेशच्या प्रेमात एवढी आंधळी झाली होती की, ती समजायला तयार नव्हती. काय दिवसांनी श्वेता ही लहान बहीण योगेश्रीला घेऊन नागपुरातच खाजगी नोकरी करू लागली. परंतु काही दिवसानंतर आई एकटीच राहत असल्याने श्वेताने लहान बहिण योगेश्रीला गावाला पाठवले. या दरम्यान लहान बहिणीला आईचे आणि मुकेश त्रिवेदी यांचे संभाषणाचे रेकॉर्डिंग मोबाईल मध्ये मिळाले. यात वडिलांना औषध देऊन उशीने तोंड दाबून मारल्याचे ती त्रिवेदी यांना सांगत आहे. तर त्रिवेदी हे पुरावे नष्ट करण्याचे सल्ले देत असल्याचे संभाषणात आहे. अशा मुलीच्या तक्रारीवरून ब्रह्मपुरी पोलिसांनी रंजना रामटेके व मुकेश त्रिवेदी याच्यावर गुन्हे दाखल करून दोघांनाही अटक केली आहे पुढील तपास ब्रह्मपुरी पोलीस करीत आहे.
News - Chandrapur