महत्वाच्या बातम्या

 राज्यस्तरीय मास्टर ट्रेनर शिबीराची नोंदणी १३ ऑक्टोंबर पासून सुरु


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : राज्यात क्रीडा संस्कृतीचे संवर्धन, प्रचार, प्रसार व जोपासना करण्यासाठी पोषक वातावरण असणे आवश्यक आहे. याच भूमिकेतून राज्याचे क्रीडा धोरण 2012 घोषित करण्यात आलेले आहे. याअनुषंगाने विविध  खेळामधिल बदलेले आधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षणाच्या पद्धती, नवीन खेळ,खेळांची शास्त्रोक्त माहिती वेळोवेळी शिक्षकांना होणे आवश्यक आहे. तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर क्रीडा शिक्षकांच्या ज्ञानात भर पडावी व वेळोवेळी क्रीडा क्षेत्रात होणारे बदल अवगत होणासाठी राज्यातील शालेय शिक्षण विद्यार्थांना योग्य क्रीडा प्रशिक्षण मिळण्यासाठी क्रीडा शिक्षकांचे अद्यायावत प्रशिक्षण मिळणेकरीता राज्यस्तरावर राज्यस्तरीय मास्टर ट्रेनर शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याकरीता जिल्ह्यातील सर्व अनुदानीत, विनाअनुदानीत, उच्च माध्यमिक, माध्यमिक, प्राथमिक,आश्रमशाळा येथील कार्यरत क्रीडा शिक्षक / क्रीडा मार्गदर्शक यांना या प्रशिक्षण शिबीराचा लाभ घेता येणार आहे. राज्यस्तरावर प्रशिक्षण घेतल्यानंतर मास्टर ट्रेनर यांनी जिल्हास्तरावरील आयोजन होणाऱ्या जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबीरामध्ये मार्गदर्शन करावयाचे आहे. राज्यस्तरीय मास्टर ट्रेनर शिबीरामध्ये सहभागी होऊ इच्छिनाऱ्या शिक्षकांनी 17 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी 05.00 वाजेपर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,गडचिरोली येथे विहीत नमुन्यात माहिती सादर करावी, अधिक माहितीकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,गडचिरोली येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. असे जिल्हा क्रीडा अधिकारी प्रशांत दोंदल यांनी कळविले आहे.

  Print


News - Gadchiroli
Related Photos