महत्वाच्या बातम्या

 युवकांनी देशाच्या संसदेत नेतृत्व करण्याची क्षमता विकसित करावी :  खा. रामदास तडस


जिल्हा पडोस युवा संसदचे आयोजन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /वर्धा : देशाच्या युवकांमध्ये विविध प्रकारचे गुण आहे. या युवकांनी देशाच्या संसदेत नेतृत्व करण्याची क्षमता विकसित करावी, असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले. नेहरु युवा केद्र व यशवंत महाविद्यालयाच्या वतीने यशवंत महाविद्यालय येथे जिल्हा पडोस युवा संसद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला वैद्यकीय जनजागृती मंचचे अध्यक्ष डॉ. सचिन पावडे, अतुल शर्मा, डॉ. संजय धोटे, प्राचार्य रविंद्र बेले, निसर्ग सेवा समितीचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे, जिल्हा युवा अधिकारी शिवधन शर्मा यांची प्रमुख उपस्थित होती.

जी-20 चे अध्यक्षस्थान भारत देशास मिळाले आहे. ही देशासाठी गौरवाची बाब आहे. युवाशक्तीला ताकद देण्यासाठी वाय -20 ची शक्ती म्हणजे युवकांची भुमिका महत्वाची आहे. या युवा संसदेतील 700 युवक युवतींपैकी अनेक युवकांनी नेतृत्व करण्याची क्षमता विकसित करावी, असे खासदार तडस म्हणाले. हवामानात होणारे बदल, वाढते उष्ण तापमान कमी करण्याकरीता युवकांनी केलेले छोटे छोटे प्रयत्न  मोठा बदल घडवून आणू शकतात, असे डॉ. सचिन पावडे म्हणाले. अतुल शर्मा यांनी आंतरराष्ट्रीय तृण धान्य वर्षाच्या औचित्याने भरड धान्याची पोषकता व जमिनीचा पोत सुधारण्यासाठी भरड धान्याचे महत्व यावर मार्गदर्शन केले. बेलखोडे यांनी युवकांमधील ऊर्जावान नेतृत्व समोर यायला पाहिजे, असे सांगितले तर डॉ. संजय धोटे, डॉ. बेले यांनी सुध्दा आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमा दरम्यान यशवंत महाविद्यालयाच्या चमुनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा युवा अधिकारी शिवधन शर्मा यांनी केले. संचालन सतिश इंगोले यांनी केले तर आभार आचल देशमुख यांनी मानले. कार्यक्रमाला नेहरु युवा केंद्राचे पर्यवेक्षक दयाराम रामटेके, शुभम ताकसांडे, अमोल चवरे, राष्ट्रीय युवा स्वयंसेवक सुरज राऊत, तनु मरापे, पियुश सहापायले, शितल उरकुडकर, आकाश चौधरी, सुरज थुल, दिपाली अंबाडकर, यशवंत महाविद्यालयातील सर्व प्राद्यापक व विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते.





  Print






News - Wardha




Related Photos