माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते क्रिकेट क्लब तर्फे आयोजित टेनिस बॉल स्पर्धेचे उद्घाटन संपन्न
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / अहेरी : तालुक्यातील आलापल्ली ग्रामपंचायत येथे गोंड मोहल्हा प्रीमियम लिंग क्रिकेट क्लब तर्फे आयोजित भव्य टेनिस बॉल ३० यार्ड सर्कल सामने (रात्रकालीन) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर क्रिडा स्पर्धेसाठी पहिले पारितोषिक जिल्हा परिषद माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या कडून तर दूसरा पारितोषिक माजी आमदार दीपक आत्राम पुरस्कार या स्पर्धेच्या विजेता संघाला देण्यात येणार आहे. आज सदर स्पर्धेचे उदघाटन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून माजी सरपंच विजय कूसनाके होते. यावेळी मंचावर संजय चारुडुके माजी जि. प. सदस्य मनोज बोलुवार ग्रा. प. सदस्य आलापल्ली, हडपे , मीरा सडमेक, कैलास कोरेत, मुरलीधर सडमेक, वासुदेव आलाम गावातील महिला पुरुष उपस्थित होते. यावेळी मंडळाचे अध्यक्ष विक्रम तलांडे, उपाध्यक्ष दीपक कलगीरवार , सचिव अमोल उरेत, सहसचिव रुपेश आत्राम व खेळाडू उपस्थित होते.
News - Gadchiroli