गडचिरोली : जून ते ऑगस्ट दरम्यान ८०९.१ मिमी पावसाची नोंद, गतवर्षीपेक्षा ३० टक्के कमी पडला पाऊस


- गतवर्षी ऑगस्ट महिन्यापर्यंत १००९. ७ मिमी पावसाची नोंद 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या ४ महिन्याच्या कालावधीत पावसाची सरासरी १२५४. १ मिमी होत असून ऑगस्ट महिन्यापर्यंत गतवर्षीपेक्षा ३० टक्के पाऊस कमी पडल्याची नोंद झाली आहे. गतवर्षी ३१ ऑगस्ट पर्यंत १००९. ७ मिमी पावसाची नोंद झाली होती तर यावर्षी ८०९. १ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात १ जून ते ३० सप्टेंबर या मान्सून कालावधीत १२५४. १ मिमी पावसाची नोंद होत असते.  गतवर्षी जिल्ह्यात चांगला पाऊस पडला होतो. यावर्षी १ जून ते ३१ ऑगस्ट पर्यंत १०६५. ३ मिमी पाऊस अपेक्षित होता मात्र ८०९. १ मिमी च पाऊस पडला. हि टक्केवारी आज पर्यंत अपेक्षित सरासरीच्या ७५. ९ टक्के आहे. गतवर्षी १००९. ७ मिमी एवढा पाऊस पडला होता. हि टक्केवारी ९४. ८ टक्के एवढी होती. गेल्यावर्षीच्या तुलनेत आतापर्यंत ३० टक्के कमी पाऊस पडला आहे. यामुळे अनेक नदीपात्र कोरडेच आहे. तर रोवणीवरही याचा विपरीत परिणाम झाला नसून अद्यापहि अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील रोवणीची कामे पूर्ण झाले नाहीत.   Print


News - Gadchiroli | Posted : 2021-08-31
Related Photos