महत्वाच्या बातम्या

 पत्नीची गळा आवळून हत्या : पतीला अटक


- आकस्मिक मृत्यूची नोंद; शवविच्छेदन अहवालातून हत्येचा उलगडा, भावाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : पत्नीला मारहाण करून त्यानंतर गळा आवळून तिची हत्या केल्याचा आरोप असलेल्या पतीला मानकापूर पोलिसांनी अटक केली. पत्नीच्या मृत्यूनंतर आरोपीने शोकाकुल असल्याचे भासविल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. सुरुवातीला पोलिसांनी या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली होती. मात्र, शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात महिलेचा मृत्यू गळा आवळल्याने झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर प्रकरणाचा तपास हत्येच्या दिशेने सुरू करण्यात आला. मृत महिलेचे नाव यामिनी कृष्णलाल यादव ३८ वर्षे असून त्या झिंगाबाई टाकळी येथील गोविंद सिटी, टॉवर-३ येथे राहत होत्या. आरोपी पतीचे नाव कृष्णलाल शिवराम यादव ४१ वर्षे आहे.

शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक बाब उघड -
यामिनी यादव यांच्या मृत्यूनंतर सुरुवातीला मानकापूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. मात्र, शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात त्यांच्या मृत्यूचे कारण गळा आवळणे असल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला आणि घटनेचा सखोल तपास सुरू करण्यात आला. तक्रारीनुसार, कृष्णलाल यादव याने पत्नी यामिनी यांना आधी मारहाण केली आणि त्यानंतर त्यांचा गळा आवळून हत्या केल्याचा आरोप आहे. पत्नीच्या मृत्यूनंतर त्याने शोकाकुल असल्याचे नाटक केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

भावाच्या तक्रारीवरून हत्येचा गुन्हा -
मृत यामिनी यांचे मोठे भाऊ राजेंद्र रामयश यादव ४९ वर्षे, रा. जयभारतनगर, ठाणे, यांनी मानकापूर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीत त्यांनी कृष्णलाल यादव याच्यावर पत्नीच्या हत्येचा आरोप केला. तक्रारीच्या आधारे मानकापूर पोलिसांनी कृष्णलाल यादव याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३ (१) अन्वये हत्येचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली. सुरुवातीला आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद झालेल्या या घटनेत शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालामुळे महत्त्वाचा खुलासा झाला. या प्रकरणाचा पुढील तपास मानकापूर पोलिसांकडून सुरू आहे.





  Print






Related Photos