सर्वोदय महाविद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : विद्या प्रसारक संस्था संचालित सर्वोदय महाविद्यालय, सिंदेवाही येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती २ ऑक्टोबर रोजी उत्साहात साजरी करण्यात आली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुशील कुंजलवार यांचा मार्गदर्शनात हां कार्यक्रम घेतला गेला. अध्यक्षस्थानी डॉ. रिझवान शेख होते. कार्यक्रमाला रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. रमेश राठोड, प्रा. अशोक भोसले, प्रा. चेतना अगडे, प्रा. अपर्णा कोवे, प्रा. श्रिया वरभे, प्रा. जयंत रामटेके, प्रा. मेश्राम , प्रा. हरने,प्रा.जाधव , यांच्यासह शिक्षकेत्तर कर्मचारी तरू मून, नीतिन सागुडले,कालीदास गेडाम व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जयंतीनिमित्त महाविद्यालय परिसरात स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले. या अभियानात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत महाविद्यालय परिसराची स्वच्छता केली. विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करत या उपक्रमाला उत्कृष्ट प्रतिसाद दिला.
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या विचारांचा आदर्श घेऊन स्वच्छता, शिस्त, सत्य, अहिंसा आणि सामाजिक बांधिलकी या मूल्यांची जोपासना करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.




Petrol Price




