चिखलवर्धा येथे निलगायीची शिकार केल्याप्रकरणी आरोपी अब्दुल शहा गाजी सह चार आरोपीन्ची निर्दोष मुक्तता


- घाटंजी येथील प्रथम वर्ग न्यायदन्डाधिकारी प्रविण पाटील यांचे आदेश
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / घाटंजी : चिखलवर्धा येथील सन्शयीत आरोपी अब्दुल शहा नैमुल्लाशहा गाझी, राजू मेश्राम, मो. जफर नुर मोहम्मद व रविंद्र उर्फ गोलू आत्राम यांना घाटंजी येथील न्यायालय क्रमान्क १, प्रथम श्रेणी न्यायदन्डाधिकारी प्रविण पाटील (JMFC PRAVIN PATIL) यांनी पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली आहे. आरोपी अब्दुल शहा गाझी व इतरांची बाजू यवतमाळचे प्रसिद्ध फौजदारी वकील ADV. एस. एम. अली यांनी मान्डली.
पारवा येथील वन परिक्षेत्र अधिकारी माधव कनिराम आडे यांनी ०६ नोव्हेंबर २०१७ रोजी दिलेल्या फिर्यादी नुसार, सन्शयीत आरोपी अब्दुल शहा नैमुल्लाशहा गाजी, राजू मेश्राम, मो. जफर नुर मोहम्मद व रविंद्र उर्फ गोलु आत्राम विरुद्ध भारतीय वन्यजीव सरक्षण अधिनियम, १९७२ चे कलम २, ९, ३९, ४४, ४८ व ५१ अन्तर्गत गुन्हा नोन्दविण्यात आला. तसेच २८ मार्च २०१५ रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सहाय्यक वन सरक्षक सुनील हजारी, तत्कालीन वन परिक्षेत्र अधिकारी अमर सिडाम व इतर वन कर्मचारी यांनी चिखलवर्धा येथे रस्त्यालगत मोकळ्या जागेची पाहणी केली असता, त्यान्ना वन्यप्राणी निलगायीची खुरे भाजलेल्या अवस्थेत व काही मासाचे तुकडे मिळून आले.
तसेच सन्शयीत आरोपी अब्दुल शहा गाझी यांच्या घराच्या मागील बाजूस रक्ताने माखलेली प्लस्टीकची पिशवी तसेच भिन्तीलगतच्या नालीत पोत्यात निलगायीची ओन्डके व कातडीचे मोठमोठे तुकडे आढळले. विशेष म्हणजे अब्दुल शहा गाझी यांच्या घराची झडती घेतले असता, घरातून एक एअरगन, एक जिवन्त काडतूस ईत्यादी मिळून आले.
सरकारी पक्षातर्फे एकूण ०३ साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी पक्ष गुन्हा सिद्ध करण्यास अपशयी ठरल्याने चारही आरोपीन्ची निर्दोष मुक्तता करण्यात आली. सदर प्रकरणात सुरवातीला ADV. अनन्तकुमार कुमार पान्डे (घाटंजी) यांनी आरोपीची बाजू मान्डली, तदनन्तर ADV. एस. एम. अली (यवतमाळ) यांनी सदर प्रकरणात प्रखर युक्तीवाद केला.




Petrol Price




