महत्वाच्या बातम्या

 नायलॉन मांजाला कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी नियमावली तयार होणार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : नागपूर व अमरावती विभागात नायलॉन मांजाची विक्री, साठवणूक, वाहतूक आणि वापरावर कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी सर्वसमावेशक नियमावली तयार करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस आयुक्त कार्यालय आणि महापालिकेच्या पातळीवर नियमावली तयार करण्यासाठी  निर्देश देण्यात आले आहेत.

या संदर्भात स्वतंत्र नियमावली तयार करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले असून नायलॉन मांजाचा वापर बंद व्हावा यासाठी न्यायालयाने १२ जानेवारी २०२६ रोजी दंडाबाबतचे आदेश पारित केले होते. 

त्यानुसार नायलॉन मांजा वापरून पतंग उडवताना आढळल्यास संबंधितास २५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल.

पतंग उडवणारी व्यक्ती अल्पवयीन असल्यास हा दंड थेट तिच्या पालकांकडून वसूल केला जाईल. मांजाचा साठा बाळगणाऱ्या विक्रेत्यावर २ लाख ५० हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल. प्रत्येक उल्लंघनासाठी हा दंड स्वतंत्रपणे वसूल केला जाणार असून याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे आवाहन अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी अनुप खांडे यांनी केले आहे.





  Print






Related Photos