सुरक्षा रक्षक मंडळाच्यावतीने २३ ऐवजी २६ ऑक्टोबर रोजी कागदपत्रे पडताळणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या कार्यक्षेत्रातील चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याकरिता ३९६ सुरक्षा रक्षकांचा समुच्चय (पूल) तयार करण्यासाठी ऑनलाईन अर्ज केलेल्या उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी १२ ऑक्टोबर पासून कामगार कल्याण मंडळ, बंगाली कॅम्प, चंद्रपूर येथे सुरूआहे.
तथापि 23 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या मतदान प्रक्रियेच्या अनुषंगाने सदर दिवशी कागदपत्रे पडताळणीसाठी उपस्थित राहण्याबाबत संदेश / ई-मेल प्राप्त झालेल्या संबंधित उमेदवारांनी २३ ऑक्टोबर ऐवजी २६ ऑक्टोबर २०२६ रोजी नियोजित स्थळी सकाळी १० वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन चंद्रपूर सुरक्षा रक्षक मंडळ, चंद्रपूर मार्फत करण्यात येत आहे. २३ ऑक्टोबर रोजी कोणतीही कागदपत्रे पडताळणी करण्यात येणार नाही, याची सर्व संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी.




Petrol Price




