महत्वाच्या बातम्या

 साहिल वाकोडे प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीची बसपाची मागणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : दिवंगत साहिल वाकोडे यांच्याशी संबंधित कथित जातीय भेदभावाच्या प्रकरणाची उच्चस्तरीय, निष्पक्ष आणि वेळबद्ध चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी बहुजन समाज पार्टीच्या वतीने जिल्हाध्यक्ष रत्नाकर साठे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रपती, महाराष्ट्राचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले.

या प्रकरणाचा सखोल तपास करून संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. तसेच राज्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये जातीय भेदभाव, मानसिक छळ आणि सामाजिक अन्यायाच्या घटना रोखण्यासाठी प्रभावी यंत्रणा तातडीने उभारावी, अशी मागणीही बसपाने केली. शिक्षणाच्या क्षेत्रात जातीय अन्याय सहन केला जाणार नाही. साहिल वाकोडे प्रकरणात न्याय मिळेपर्यंत संविधानिक आणि लोकशाही मार्गाने संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार बसपाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

यावेळी लोकसभा प्रभारी धर्मेश निकोसे, जिल्हा महासचिव सुभाष पेटकर, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. विश्वनाथजी लाडे, जिल्हा सचिव संजय मेश्राम, जिल्हा प्रभारी मिलिंद शेंडे, जिल्हा कार्यसल्लागार रवीभाऊ वानखेडे, चंद्रपूर विधानसभा अध्यक्ष सायाजी लोनारे, शहर अध्यक्ष इंजि. विमित कोसे, मनोज जांभुळे, जयकुमार देवतळे, नितेश नरगडे, नरेंद्र रंगारी, नामदेव रामटेके, हीरालाल खोब्रागडे यांच्यासह बसपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
 





  Print






Related Photos