शिरूर : लोक अदालतीमध्ये सव्वा सहा कोटींची वसुली तर १९३ फौजदारी खटले निकाली


विदर्भ न्यूज एक्स्प्रेस 
वृत्तसंस्था / शिरूर :
न्यायालयात नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये सव्वा सहा कोटी 22 लाख 56 हजार 492 रुपयांची विक्रमी वसुली झाली. मुख्य न्यायाधीश व्ही. व्ही कुलकर्णी यांच्या हस्ते लोकन्यायालयाचे उद्घाटन करण्यात आले.
यामध्ये बँक कर्ज वसुली चेक रिटर्न, वीज बिल थकबाकी व ग्रामपंचायत कर विषयक अनेक प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली. या लोकन्यायालयात 27 दिवाणी दावे व 193 फौजदारी खटले परस्पर सहमतीने व तडजोडीने निकाली काढण्यात आले. तब्बल 2993 दाखलपूर्व प्रकरणात दोन्ही बाजूंची समन्वय साधून व चर्चा करून तडजोड करण्यात आली.
यावेळी पि.के करवंदे, आर.डी हिंगणगावकर व के.एम मुंढे हे सहन्यायाधीश होते. तसेच लोक अदालतीमध्ये पॅनेल जज्ज म्हणून ॲड. शिवाजी वर्पे, ॲड.महेश रासकर, ॲड.स्वप्नील माळवे, ॲड. वहाब पटेल, ॲड.धनश्री शेगर व ॲड.अक्षदा वाघ यांनी कामकाज पाहिले. घोडनदी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. दिलीप गिरमकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तसेच तसेच सर्व कार्यकारणी सदस्य व पदाधिकाऱ्यांनी लोकन्यायालय यशस्वी होण्यासाठी विशेष सहकार्य केले.  Print


News - Rajy | Posted : 2021-10-03
Related Photos