लोकतंत्र बचाव, अराजकता हटाव,पदयात्रे करिता गडचिरोली विधानसभेतून हजारो कार्यकर्ता नागपूर येथे रवाना!


- भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रणय भाऊ खुणे, यांनी हिरवी झेंडी दाखवून, गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील वाहणांना केले रवाना!
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : विधानसभा मतदारसंघातून गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मिलिंद भाऊ नरोटे यांच्या नेतृत्वात हजारो कार्यकर्त्यांचा समूह आज खाजगी ट्रॅव्हल्स व वाहनाने गडचिरोली येथून नागपूर येथे भारतीय जनता पार्टी विदर्भ प्रदेशाच्या वतीने आयोजित पदयात्रे करिता रवाना झाले यावेळी या रवाना झालेल्या हजारो कार्यकर्त्याच्या वाहणांच्या समूहाला भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रणय भाऊ खुणे यांनी आपल्या शुभ हस्ते हिरवी झेंडी दाखवून रवाना केले.
यावेळी भाजपा नेते जेष्ठ भारत खटी,आमदार नरोटे यांचे स्वीय सहाय्यक चेतन भाऊ गोरे, केतन बुरांडे, राष्ट्रीय मानवाधिकार संघटन जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, जिल्हा उपाध्यक्ष नानू भाऊ उपाध्ये, भाडभीडी पंचायत समिती क्षेत्र प्रमुख विनोद किरमे, रेगडी पंचायत समिती क्षेत्र प्रमुख पलाश घरामी, सुमेन विश्वास,दिनेश मुजुमदार,संदीप भोवरे, सुकंठ राय, देवाजी सातपुते, संदीप गव्हारे,रमेश लेकलवार, राजू सातपुते, विलास सावकार वडेट्टीवार, शुभम दास व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Petrol Price




