महत्वाच्या बातम्या

 सक्षमता महिला सेवा सहकारी संस्थेबाबत ७ ऑक्टो रोजी सुनावणी


- हरकती असल्यास ७ ऑक्टोपूर्वी दाखल करण्याचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : नियोजीत सक्षमता महिला सेवा सहकारी संस्था, मर्या. चंद्रपूर या सहकारी संस्थेचा नोंदणी प्रस्ताव सहायक निबंधक सहकारी संस्था या कार्यालयास प्राप्त झाला आहे. संस्थेच्या नोंदणी संबंधाने काही हरकती असल्यास या कार्यालयात ७ ऑक्टोबर पूर्वी सादर कराव्यात किंवा सुनावणीचे वेळी हरकती असल्यास दाखल कराव्यात.

या कार्यालयात विहित मुदतीत हरकती प्राप्त न झाल्यास किंवा सुनावणीला हजर न राहिल्यास संबंधीत सहकारी संस्थांना नोंदणी संबंधाने काही म्हणावयाचे नाही, असे गृहीत धरून पुढील कार्यवाही करण्यात येईल, याची चंद्रपूर तालुक्यातील बेरोजगार, सुशिक्षीत बेरोजगार, महिला बहुउद्देशिय व इतर बेरोजगार सेवा सहकारी संस्थांनी नोंद घ्यावी, असे सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था एस.एस.तुपट यांनी कळविले आहे.





  Print






Related Photos