वीर शहीद सत्यवान कसनवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली : बिरसा मुंडा चौक गोकुळनगर येथे स्मृतिदिनानिमित्त अभिवादन.


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील मोठा झेलिया येथे १६ ऑक्टोबर २०१३ रोजी झालेल्या नक्षली हल्ल्यात वीरमरण आलेले गोकुळनगर, गडचिरोली येथील वीर शहीद सत्यवान गणपत कसनवार यांच्या स्मृतीस उजाळा देण्यासाठी १६ ऑक्टोबर रोजी क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा चौक, गोकुळनगर येथे शहीद सत्यवान कसनवार यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
वीर शहीद सत्यवान गणपत कसनवार यांनी देशसेवेच्या कर्तव्यावर असताना नक्षली हल्ल्यात आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या बलिदानाला आज तेरा वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने उपस्थितांनी त्यांच्या शौर्यपूर्ण कार्याचे स्मरण केले. त्यांच्या त्यागाची आणि बलिदानाची आठवण सदैव जिवंत राहावी, तसेच त्यांच्या कार्यातून नव्या पिढीला देशसेवेची प्रेरणा मिळावी, या भावनेतून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली
या श्रद्धांजली कार्यक्रमाला आदिवासी एकता युवा समितीचे जिल्हाध्यक्ष अमोल कुळमेथे, वीर शहीद सत्यवान कसनवार यांचे लहान बंधू अमोल गणपत कसनवार, संघटक संजय मेश्राम, साहित्यिक शेषराव मडावी, डॉ. कैलास अलाम, पुरुषोत्तम सिडाम, पुंडलिक नैताम, रमजान शेख, अभिषेक नवघडे, मंगेश पुरनवार यांच्यासह गोकुळनगरमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सर्व उपस्थितांनी वीर शहीद सत्यवान गणपत कसनवार यांच्या स्मृतींना अभिवादन करत त्यांच्या बलिदानाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. त्यांच्या शौर्याची गाथा आणि देशासाठी दिलेले सर्वोच्च बलिदान सदैव स्मरणात राहील, अशा भावना आदिवासी एकता युवा समिती जिल्हाध्यक्ष अमोल कुळमेथे यांनी व्यक्त केली.




Petrol Price




