बचतीच्या पैशातून इशिका प्रविण चन्नावार कडून मातोश्री वृद्धाश्रम येथे वृद्धांना जीवनावश्यक वस्तू फळे अल्पोपहार वाटप

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : सामाजिक कार्यकर्ते प्रविण चन्नावार यांच्या कन्या इशिका प्रविण चन्नावार यांच्या वाढदिवसानिमित्त स्वतःच्या केलेल्या बचतीतून मातोश्री वृद्धाश्रम येथे वृद्धांना जीवनावश्यक वस्तू ,फळे, अल्पपोहार वितरण करण्यात आले.कार्यक्रमात प्रविण चन्नावार, सुनिल राऊत,वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक गंगाधर चंदावार ,भुरकाबाई रोहकर,जान्हवी चन्नावार, इशिका चन्नावार उपस्थित होते.वाढदिवसाचा अनावश्यक खर्च न करता तोच पैसा मातोश्री वृद्धाश्रम येथे खर्च करण्याचा उपक्रम दरवर्षी प्रमाणे यावर्षी राबविण्यात आला.आजच्या काळात वाढदिवस म्हटलकी मोठा खर्च,पार्ट्या करण्याकडे कल असतो.
परंतु आपण समाजाचे काही देणे लागतो.या सामाजिक दायित्व म्हणून वेगळे स्वरूप न देता वृद्धाश्रम मधील वृद्धानच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा प्रयत्न केला.त्यांच्या या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी आणि गरजूंच्या मदतीची भावना अधोरेखित झाली आहे.ऑगस्ट महिन्यातच मोठी बहिण जान्हवी प्रविण चन्नावार यांनी गरजू विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्य वाटप करून सामाजिक बांधलकी जोपासली. व आता आपल्या वाढदिवशी वृद्धांच्या चेहऱ्यावर हसू फुलविण्याचा प्रयत्न इशिका प्रविण चन्नावार यांनी केला.
असेच प्रयत्न दरवर्षी कुटुंबीयातून केले जाते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक चंदावार यांनी मानले.तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लोणारे, भुरका बाई यांनी सहकार्य केले.




Petrol Price




